Inflation News : सणासुदीला भाज्या, खाद्यतेल, धान्याच्या किमती आटोक्यात राहणार का?

Inflation News : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू न देण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

47
Inflation News : सणासुदीला भाज्या, खाद्यतेल, धान्याच्या किमती आटोक्यात राहणार का?
  • ऋजुता लुकतुके 

देशात आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भाज्या, फळं, धान्य, खाद्यतेल यांचा गोदामांमधील साठा आणि वितरण यावर सरकार लक्ष ठेवून आहे. तसंच या वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांनाही सरकारने सूचना केल्या आहेत. कमाल किमती किती असाव्यात याची मार्गदर्शक तत्त्वच सरकारने आखून दिली आहेत.  (Inflation News)

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केलाय. अलीकडेच सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. पण, गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा अन्न ग्राहक मंत्रालयाचा दावा आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, मंगळवारीच खाद्यतेल कंपन्यांना तात्काळ किंमती वाढवू नयेत असे सांगण्यात आले आहे. म्हणजे सध्या जुन्याच दराने खाद्यतेलाची विक्री सुरू राहणार आहे. (Inflation News)

(हेही वाचा – Afg vs SA, ODI Series : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का, पहिल्यांदाच जिंकली एकदिवसीय मालिका)

सूर्यफूल तेल, पामतेल आणि सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढ लागू आहे. पण, अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत, आयात शुल्कामध्ये बदल केल्यानंतर, नवीन दर १४ सप्टेंबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. कच्च्या तेलावर आयात शुल्क ०.२० टक्के आहे, तर रिफाइंड तेलावर ते आता साडे बारा ते ३२.५ टक्के इतकं आहे.  (Inflation News)

या उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांना किंमती वाढवू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रयत्नांना यश आल्यास या सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, उद्योगात ३० लाख टन खाद्यतेल शून्य शुल्कावर आयात केले जाते, जे ४५ ते ५० दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसे आहे.  मंगळवारी केंद्र सरकारने खाद्यतेल संघांना ० टक्के आणि १२.५ टक्के बेसिक कस्टम ड्युटीवर आयात केलेल्या खाद्यतेलाचा साठा उपलब्ध होईपर्यंत तेलाची छापील किंमत स्थिर ठेवण्याचा सल्ला दिला होता. सरकार गहू खुल्या बाजारात विकणार नाही, सध्या व्यापाऱ्यांकडे १०० लाख टन गहू उपलब्ध आहे. (Inflation News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.