Narayana Nethralaya Eye Hospital : कोण आहेत नारायण नेत्रालयाचे संस्थापक आणि का आहे हे रुग्णालय प्रसिद्ध?

131
Narayana Nethralaya Eye Hospital : कोण आहेत नारायण नेत्रालयाचे संस्थापक आणि का आहे हे रुग्णालय प्रसिद्ध?

नारायण नेत्रालयाने (Narayana Nethralaya) गेल्या ४० वर्षांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यांनी आपल्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. डॉ. कटकेरी भुजंग शेट्टी यांची नेत्रसेवा प्रशिक्षण, सेवा आणि संशोधनाचे ‘ड्रीम सेंटर’ स्थापन करण्याची मनसा प्रत्यक्षात उतरलेली आहे. नारायण नेत्रालय हे राजाजीनगर इथे आहे. हे एक सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं उद्घाटन १९९३ साली पद्मभूषण पुरस्कार प्राप्तकर्ते डॉ. राजकुमार यांच्या हस्ते झालं होतं.

१९८२ साली श्रीरामपुरम, बंगळुरू येथे एक नेत्र चिकित्सालय डॉ. कटकेरी भुजंग शेट्टी आणि देशातल्या नेत्ररोग आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दिग्गजांनी स्थापन केलं. नारायण नेत्रालय असं त्या नेत्र चिकित्सालय केंद्राचं नाव आहे. तसंच नारायण हेल्थ सिटी येथे नारायण नेत्रालय (Narayana Nethralaya) सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटलची स्थापना २००७ साली झाली. हे हॉस्पिटल ७५,००० चौरस फूट आकाराच्या भूखंडावर दक्षिण बंगळुरू येथे उभारण्यात आलं आहे.

तर इंदिरानगर इथलं नारायण नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल हे २०२१ साली स्थापन करण्यात आलं. हे हॉस्पिटल सेंट्रल बिझनेस जिल्ह्याच्या मध्यभागी २५,००० चौरस फूट एवढ्या मोठ्या भूखंडावर पसरलेलं आहे. याव्यतिरिक्त बन्नेरघट्टा रोड इथल्या नारायण नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटलची स्थापना २०१५ साली झाली. हे हॉस्पिटल ३८,००० चौरस फूट एवढ्या भूखंडावर दक्षिण बंगळुरू येथे उभारण्यात आलं होतं. (Narayana Nethralaya Eye Hospital)

(हेही वाचा – Lebanon Pager Blast: लेबनान पेजर स्फोटात भारतीय वंशाचा नागरिक चर्चेत! काय आहे कारण?)

नारायण नेत्रालय बद्दल थोडेसे

नारायण नेत्रालय (Narayana Nethralaya) हे बंगळुरू इथलं एक सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांना दर्जेदार नेत्रसेवा आणि नेत्रविकारांवर उपचार केले जातात. नारायण नेत्रालय हे कर्नाटकातले सर्वोत्कृष्ट नेत्रसेवा हॉस्पिटल म्हणून दहा वर्षांपेक्षाही जास्त काळापासून कार्यरत आहे.

या हॉस्पिटलमध्ये राज्यातली एकमेव नेत्रपेशी, आण्विक, अनुवांशिक आणि नेत्र जनुक थेरपी लॅब उपलब्ध आहे. नारायण नेत्रालय येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपचार तंत्रे, अत्यंत अनुभवी आणि पुरस्कार विजेते नेत्रतज्ज्ञ, तसंच सक्षम कर्मचारी आणि प्रमाणित टेक्निशियन सर्व रुग्णांसाठी उत्कृष्ट नेत्रसेवा प्रदान करण्यासाठी आणि केलेल्या उपचारांचे शक्य तितके सर्वोत्तम रिझल्ट्स प्राप्त करण्यासाठी सतत मेहनत घेत असतात.

नारायण नेत्रालय हे राजाजीनगर, होसूर रोडवरच्या बोम्मासंद्र, इंदिरानगर आणि बन्नेरघट्टा रोड या चार मध्यवर्ती ठिकाणी वसलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या नेत्रचिकित्सा दिल्या जातात. या हॉस्पिटलमध्ये एका दिवसात १२०० पेक्षा जास्त रुग्णांना सेवा पुरवली जाते. इथे शंभरपेक्षा जास्त हाय क्लास आणि कामाप्रति समर्पित असलेले नेत्र विशेषज्ञ आणि सर्जन आहेत. (Narayana Nethralaya Eye Hospital)

(हेही वाचा – Sumit Nagal : सुमित नागलने डेव्हिस चषकात खेळण्यासाठी ५० लाख रुपये मागितले?)

समाजकल्याणासाठी नारायण नेत्रालय
  • कमी आणि उच्च उत्पन्न गटांना एकसमान उपचार प्रदान करते.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाची नेत्रसेवा प्रदान करण्यासाठी आपलं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा सतत अपग्रेड करतात.
  • नारायण नेत्रालयाने गरीब आणि गरजूंना मोफत किंवा सवलतीच्या दरात दर्जेदार नेत्रसेवा मिळण्याची खात्री करून त्यांना नेहमीच आधार दिला आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये, नारायण नेत्रालयाने राज्यभरातल्या गरिबांसाठी ९.३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान आणि मोफत शस्त्रक्रिया सेवांमध्ये सूट दिली आहे.
  • पैशाच्या अभावी कोणत्याही मुलाला दृष्टी प्रदान करणारी शस्त्रक्रिया नाकारली जात नाही.
  • ग्रामीण, उपनगर आणि शहरी भागात वंचित लोकांसाठी दरवर्षी १७० पेक्षा जास्त मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. (Narayana Nethralaya Eye Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.