Afg vs SA, ODI Series : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का, पहिल्यांदाच जिंकली एकदिवसीय मालिका

Afg vs SA, ODI Series : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकन संघावर १७७ धावांनी विजय मिळवला. 

90
Afg vs SA, ODI Series : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का, पहिल्यांदाच जिंकली एकदिवसीय मालिका
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ या खेळात आता आपली ताकद दाखवून देत आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडला धूळ चारणारा हा संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर भारी पडला आहे. शारजा इथं सुरू झालेल्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची किमया केली आहे. अफगाण संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. त्यातही पहिला सामना जिंकताना त्यांनी आफ्रिकेला १०६ धावांत गुंडाळलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात त्यांनी १७७ धावांनी विजय संपादन केला आहे. हा अफगाण संघाचा सगळ्यात मोठा एकदिवसीय विजय आहे.

रहमनुल्ला गुरबाझने १०५ धावा करत अफगाण संघाची धावसंख्या निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३११ वर नेली. राशीद खानने १९ धावांतच ५ बळी घेत आफ्रिकन डाव १३४ धावांत गुंडाळला. त्यामुळे अफगाणिस्तानने मोठा विजय साकारला. आणि ३ सामन्यांची ही मालिका २-० अशी आघाडी घेतली आहे. (Afg vs SA, ODI Series)

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi: निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर!)

यापूर्वी पहिला सामना अफगाणिस्तानने ६ गडी राखून जिंकला होता. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीने ४, अल्लाह गझनफरने ३ आणि राशिद खानने २ बळी घेतले. फलंदाजीमध्ये गुलबदिन नायबने ३४ धावा आणि अजमतुल्ला उमरझाईने २५ धावा केल्या. या विजयासह अफगाणिस्तानने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला कुठल्याही प्रकारात हरवण्याची ही पहिलीच वेळ. याआधी दोन्ही संघांमध्ये ३ टी२० आणि २ एकदिवसीय सामने झाले आहेत. या वर्षी २६ जून रोजी टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला ५६ धावांत गुंडाळले होते. त्या पराभवाचा थोडा वचपा अफगाण संघाने इथे काढला. एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १०६ धावांत गुंडाळले. (Afg vs SA, ODI Series)

(हेही वाचा – District Collector: नक्की कोण असतात जिल्हाधिकारी? सुविधांपासून पगारापर्यंत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)

विशेष म्हणजे आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली होती. पण, वेन मुल्डरचं अर्धशतक वगळता इतर फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. त्याच्यासोबत बॉर्न फॉर्च्युनने १६ धावा केल्या. नांद्रे बर्जरने एक धाव घेतली, तर लुंगी एनगिडीला खातेही उघडता आले नाही. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीने ३५ धावांत ४ बळी घेतले. अल्लाह गझनफरने अवघ्या २० धावांत ३ बळी घेतले. तर राशिद खानने ३० धावांत २ बळी घेतले.

१०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ३५ धावांत ३ गडी गमावले होते. अजमतुल्ला उमरझाई आणि गुलबदिन नायब यांनी अफगाण डाव सावरला. ओमरझाई २५ धावा करून नाबाद राहिला तर नायब ३४ धावा करून नाबाद राहिला. आता तिसरा एकदिवसीय सामना २२ सप्टेंबरला शारजामध्ये होणार आहे. (Afg vs SA, ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.