वाहन चालकांनो Atal Setu वर ट्रॅफिक नियम मोडाल तर, सावधान… 

189
वाहन चालकांनो Atal Setu वर ट्रॅफिक नियम मोडाल तर, सावधान... 
वाहन चालकांनो Atal Setu वर ट्रॅफिक नियम मोडाल तर, सावधान... 

अटल सेतूवर (Atal Setu) लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (Intelligent Traffic Management System) कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे या यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. आयटीएमएसची (ITMS Test) चाचणी पूर्ण झाल्यावर या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  (Atal Setu)

अटल सेतूवर ३७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये ‘इन्सिडेंट डिटेक्शन’ (Incident Detection) प्रणाली आहे, जी वाहनांचा वेग मोजू शकते. तसेच हे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान असलेले कॅमेरे असून वाहतूक नियमांचे उल्लंघन शोधण्यात मदत करतील. परिवहन विभागाने (Department of Transport) या यंत्रणेची चाचणी न केल्यामुळे तिचा वापर करून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांना चलन जारी करण्यात येत नव्हते. या प्रणालीच्या माध्यमातून फास्ट टॅग वैध नसणाऱ्या वाहनांवर चलन जारी केले जात होते. परंतु यंत्रणेची चाचणी पूर्ण झाल्यावर वाहनचालकांनी नियम मोडल्यास तत्काळ चलन जारी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.  (Atal Setu)

(हेही वाचा – Inflation News : सणासुदीला भाज्या, खाद्यतेल, धान्याच्या किमती आटोक्यात राहणार का?)

अटल सेतूवरील कॅमेऱ्याचे वैशिष्ट्ये?

नव्याने सुरू झालेल्या अटल सेतूवर ३७४ कॅमेरे असून, यामध्ये  १३० सीसीटीव्ही पाळत ठेवणारी यंत्रणा, ३६ अंडर ब्रिज सव्हिलन्स सिस्टम, १९० कृत्रिम बुद्धिमता आधारित व्हिडिओ कॅमेरे, ६ आपत्कालीन कॉलिंग बॉक्स, १२ सेक्शन स्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.