Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा

157
Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा
Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा

जिहादी मानसिकतेच्या लोकांना देशात आणि महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचा आहे. त्यामुळेच ते ठिकठिकाणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कायद्यानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी धारावीत अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. पण तेथील जिहादींनी त्याला विरोध केला. त्यांनी अतिक्रमण काढू दिले नाही. उलट त्यांनी मुंबई महापालिकेच्या वाहनांची तोडफोड केली. ही अरेरावी आणि दादागिरी आहे. हा देश संविधानानुसार चालेल. या लोकांना ताळ्यावर आणण्याचा कार्यक्रम आमच्याकडे आहे. त्यामुळे सर्वांनी कायद्याचे पालन करा. काहीही बेकायदेशीर होऊ देऊ नका. मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर त्याला जिहादी कारणीभूत असतील, असा इशारा भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी शनिवार, २१ सप्टेंबर रोजी दिला. धारावी येथे एका मशिदीवरील कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. (Dharavi Masjid Demolition)

(हेही वाचा – Air Marshal Amar Preet Singh हे नवीन हवाई दल प्रमुख ; ३० सप्टेंबर पासून स्वीकारणार पदभार)

एका मशिदीचा अवैध भाग पाडण्याच्या मुद्यावरून आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या मुंबईच्या धारावीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या ठिकाणी अवैध मशि‍दीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या गाडीवर धर्मांधांनी दगडफेक केली. तसेच रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. यामुळे खबरदारी म्हणून येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत उपरोक्त टीका केली.

उबाठा आणि काँग्रेस दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे – किरीट सोमय्या

दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी मुस्लिमांच्या लांगुलचालनावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीत मुसलमानांचे लांगूलचालन चालणार नाही. राज्यात उबाठा आणि काँग्रेस दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून मुसलमानांचे लांगुलचालन सुरु असून, केंद्र सरकारने एखादे विधेयक आणले, तरीही ते अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. (Dharavi Masjid Demolition)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.