ठरलं ! पुणे विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव; Devendra Fadsanis यांची पुण्यात घोषणा

53
ठरलं ! पुणे विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव; Devendra Fadsanis यांची पुण्यात घोषणा
ठरलं ! पुणे विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव; Devendra Fadsanis यांची पुण्यात घोषणा

पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांचं नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Saint Tukaram Maharaj) यांनी केली आहे. शनिवारी (२१ सप्टेंबर) देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (MP Muralidhar Mohol) यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती शनिवारी (२१ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.  (Devendra Fadsanis)

सभेत जनतेला संबोधित कारताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या नावासंदर्भात प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं, तर त्याचा सगळ्यांना आनंद होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (Devendra Fadsanis)

(हेही वाचा – GEM ने व्यवहार शुल्कात मोठ्या कपातीची केली घोषणा)

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर पॅकेज ६ रस्त्यांचे चौपदरीकरण, मुळा व मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम, सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत १.६ किमी लांबीच्या सेवा रस्त्याचे बांधकाम, या सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. (Devendra Fadsanis)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.