- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांमुळे आधीच जनता त्रस्त आहेत, त्यातच आता याच फेरीवाल्यांचे साहित्य येथील आसपासच्या इमारती, गल्लींमध्ये ठेवले जात असल्याने येथील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दादर पश्चिम येथील पुस्तक गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या गल्लीमध्ये आधीच कचऱ्याचे डबे आणि त्या कचऱ्यामुळे तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधींचे साम्राज्य पसरले आहे तसेच फेरीवाल्यांच्या हातगाड्या, त्यांचे सामान आणि अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन हप्ते देणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आहे करदात्या नागरिकांसाठी आहे असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. (Dadar)
(हेही वाचा – GEM ने व्यवहार शुल्कात मोठ्या कपातीची केली घोषणा)
मोठ्याप्रमाणात पसरली जाते दुर्गंधी
दादर पश्चिम येथील रानडे मार्ग व एन सी केळकर रोडला जोडल्या जाणाऱ्या गल्लीला पुस्तक गल्ली, कचरा गल्ली म्हणून ओळखले जाते. गोल हनुमान मंदिर येथून एन सी केळकर रोडवरून जाणारी गल्ली डिसिल्व्हा शाळेच्या संरक्षक भिंतीच्या लगत जात रानडे मार्गाला मिळते. रानडे मार्गावरील प्रवेशद्वाराजवळ जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत तर एन सी केळकर रोडवरील प्रवेश मार्गातून फळ आणि चपलाचे स्टॉल्स आहे. या स्टॉल्सच्या पुढील बाजूस विभागातील कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दहा ते अकरा कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचरा पेट्यांमधील संकलित कचरा महापालिकेच्या वाहनांद्वारे दिवसांतून दोन वेळा उचलून नेला जातो. परंतु याठिकाणी पेट्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी बाहेरच कचरा टाकला जातो, तसेच या कचऱ्यातील पाणी खाली वाहून तिथे चिखलाची स्थिती निर्माण होते आणि यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली जाते. (Dadar)
(हेही वाचा – Dharavi Masjid Demolition : मुंबईतील परिस्थिती बिघडली, तर जिहादी कारणीभूत; आमदार नीतेश राणेंचा इशारा)
फेरीवाल्यांच्या हातगाड्या, अनधिकृत दुचाकी पार्किंग यामुळे येथील नागरिक त्रस्त
तसेच एका बाजूला कचरा पेट्यांची अडचण तर बाजूला अनधिकृत दुचाकी कार पार्किंग तसेच त्याला जोडून फेरीवाल्यांच्या हातगाड्या व त्यांचे सामान रात्रीच्या वेळी तिथे आणून ठेवले जाते. तसेच महापालिकेच्या कारवाई दरम्यान फेरीवाले आपले सामान याच गल्लीत आणून ठेवतात. त्यामुळे अस्वच्छतेमुळे पसरणारी दुर्गंधी आणि फेरीवाल्यांच्या हातगाड्या, अनधिकृत दुचाकी पार्किंग यामुळे येथील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. त्यामुळे या हातगाड्या हटवण्यात याव्यात, अनधिकृत दुचाकींवर कारवाई करावी तसेच कचरा पेट्यांच्या परिसरातील बाहेर पडणारा कचरा उचलून तसेच आसपासच्या परिसरात स्वच्छता राखली जावी, जेणेकरून नागरिकांना जो दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो तो कमी होईल. त्यामुळे येथील कोहिनूर अपार्टमेंट, दया मॅन्शन या दोन इमारतींमधील रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी महापालिका जी उत्तर विभागाला निवेदन देत यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु येथील कचऱ्यामुळे पसरणारी अस्वच्छता तसेच दुर्गंधी आणि फेरीवाल्यांच्या साहित्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. (Dadar)
(हेही वाचा – गोळीला तोफ गोळ्याने प्रत्युत्तर देऊ; Amit Shah यांचा इशारा)
फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी
कोहिनूर अपार्टमेंट, दया मॅन्शनमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कोपऱ्यावरील नवीन इमारत बनल्यापासून कचरा पेट्या अजून पुढे सरकवल्या जात आहेत. यामुळे अस्वच्छता तसेच दुर्गंधी पसरतेच शिवाय यामुळे प्रचंड किडेही पसरले जात आहे. ज्यामुळे डासांचाही प्रदुर्भाव वाढला आहे. तसेच फेरीवाल्यांच्या हातगाड्या व त्यांचे सामान आणि अनधिकृत दुचाकी वाहने उभ्या केल्या जात असल्याने येथील स्वच्छताही राखली जात नाही. परिणामी अजून या गल्लीत अस्वच्छता पसरली जाते. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (Dadar)
(हेही वाचा – ठरलं ! पुणे विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव; Devendra Fadsanis यांची पुण्यात घोषणा)
कचरा पेट्या बाजूच्या रस्त्यावर नेल्यास
तसेच या हातगाड्यांसह दुचाकी वाहने उभी असल्याने गर्दुल्ले आणि रात्रीच्या वेळी तृतीयपंथीच्या राबता असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारीची दखल घेऊन यावर कारवाई केली जात नसल्याने याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे करदात्यांच्या तुलनेत हे फेरीवाले प्रिय आहेत का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. महापालिकेने जर येथील कचरा पेट्या बाजूच्या रस्त्यावर नेल्यास या गल्लीतील निम्म्याहून अधिक समस्या दूर होईल, असे रहिवाशांनी म्हटले आहे. महापालिकेच्यावतीने सध्या स्वच्छता पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने किमान येथील स्वच्छता करावी आणि चांगले वातावरण या गल्लीत निर्माण करावे ही अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community