Central Government: वडा पावचा स्टॉल टाकताय? तर आता तुम्हाला द्यावी लागणार ५० मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश

33
Central Government: वडा पावचा स्टॉल टाकताय? तर आता तुम्हाला द्यावी लागणार ५० मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश
Central Government: वडा पावचा स्टॉल टाकताय? तर आता तुम्हाला द्यावी लागणार ५० मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश

मुंबई आणि वडापाव (Vada Pav) यांचे अतूट नाते आहे. 6 दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या स्वस्त आणि चवदार फराळाचे प्रशिक्षण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामार्फत दिले जाणार आहे. 50 मार्क्सची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या (Central Government) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले आहेत. अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणा-यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र भविष्यात ती बंधनकारक होऊ शकते. हजारो, लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात. त्यातून आपले कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचं विक्रेत्यांनी स्वागत केलंय. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे अनेक जण अशिक्षित आहेत. त्यामुळे परीक्षेऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करावी अशी मागणी विक्रेते करतायत. (Central Government)

वडापाववर आता केंद्राची नजर
आत्तापर्यंत वडापाव (Vada Pav) बनवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते, परंतु केंद्र सरकारने आता वडापावकडे लक्ष वळवले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात वडापाव विक्रेते रस्त्याच्या कडेला विकतात. मात्र, केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी निधी म्हणून 50,000 रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली होती. यामध्ये वडापाव विक्रेत्यांचाही समावेश आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रातून कर्जासाठी 13,51,951 अर्ज आले होते, त्यापैकी 11,18,289 जणांना कर्ज मिळाले आहे. त्यात मुंबईतील वडापाव उत्पादक आणि विक्रेत्यांचाही समावेश होता. (Central Government)

वडापावचा इतिहास
वडा पाव 1966 मध्ये दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड स्टॉलमध्ये आला. बेसनाच्या पिठात उकडलेले बटाटे गुंडाळून तळलेले आणि बटाटा वडा बनवायला सुरुवात केली. 1970 ते 1980 च्या दशकात मुंबईत कंपन्या बंद पडू लागल्या. मग तो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा आधार बनला. आज तुम्हाला मुंबईत दिवसा किंवा रात्री कधीही वडा पाव खायला मिळेल. वडा पाव सुरू झाला तेव्हा ६ ते ७ तास उपलब्ध असायचा. दुपारी २ ते संध्याकाळी ६ या वेळेत गाडीवर विक्री केली जात असे. पूर्वी ते फक्त मुंबईत काही ठिकाणी उपलब्ध होते. आज मुंबई असो किंवा भारतातील इतर कोणतेही शहर, तुम्हाला वडा पाव मिळेल. (Central Government)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.