Kala Ghoda परिसरातील पाच मार्ग शनिवार, रविवार सायंकाळी सहा पासून राहणार बंद; या  रस्त्यांचे होणार सुशोभीकरण 

275
Kala Ghoda परिसरातील पाच मार्ग शनिवार, रविवार सायंकाळी सहा पासून राहणार बंद; या  रस्त्यांचे होणार सुशोभीकरण 
Kala Ghoda परिसरातील पाच मार्ग शनिवार, रविवार सायंकाळी सहा पासून राहणार बंद; या  रस्त्यांचे होणार सुशोभीकरण 
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा (Kala Ghoda) परिसराची ओळख असून या भागातील  पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेच्या कालावधीदरम्यान वाहनांसाठी बंद करुन केवळ पादचारी यांच्यासाठी सुरु ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या भागातील पाचही रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
काळा घोडा (Kala Ghoda) परिसरातील पादचारी मार्ग तसेच सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) आणि  सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे (Anil Kumbhare) यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शनिवारी २१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी आढावा घेतला.  यावेळी सहायक आयुक्त (ए विभाग)  जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Untitled design 69
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा (Kala Ghoda) परिसराची ओळख आहे. नागरिक, पर्यटक आदींची या भागात नेहमीच वर्दळ असते. याच पार्श्वभूमीवर नागरिक तसेच पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’चा आनंद घेता यावा,  या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेच्या कालावधीदरम्यान वाहनांसाठी बंद करुन केवळ पादचारी यांच्यासाठी सुरु ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक)  अनिल कुंभारे यांनी संयुक्तपणे आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पर्यटक, कर्मचारी आदींशी संवाद साधला. तसेच हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया, सूचना आदी जाणून घेतल्या. (Kala Ghoda)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.