Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाला भारतात किती पगार असतो? त्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते?

Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षक ही अधिकारी पदावरील नेमणूक सरकारी नोकर भरती प्रक्रिेयेतून होत असते 

31
Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाला भारतात किती पगार असतो? त्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते?
Income Tax Inspector Salary : आयकर निरीक्षकाला भारतात किती पगार असतो? त्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते?
  • ऋजुता लुकतुके

आयकर विभाग हा भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे. भारतीय नागरिकांनी भरलेल्या आयकर विवरणपत्राच्या नोंदणी ठेवणं, नवीन आणि बदलत्या आयकर नियमांची जनतेला वेळोवेळी माहिती देणं, विवरणपत्राची छाननी आणि प्रक्रिया पूर्ण करणं, त्याविषयीचे आर्थिक व्यवहार पूर्ण कऱणं याबरोबरच विवरणपत्र भरण्यात चूक झाली असेल तर ती निदर्शनास आणून देणं आणि विवरणपत्र भरण्यात अनियमितता असेल तर दंड आकारणी तसंच गरज भासल्यास कायदेशीर कारवाई हे आयकर विभागाचं मुख्य काम आहे. (Income Tax Inspector Salary)

(हेही वाचा- युवकांना जिहादसाठी चिथावणी देणाऱ्या Zakir Naik ला पाकिस्तानने घातल्या पायघड्या)

आयकर विभागाच्या कामकाजात आयकर निरीक्षक हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. करचुकवेगिरी करणाऱ्यांवर नजर ठेवणं आणि त्यांच्याकडून आयकर वसूल करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी कायदेशीर चौकटीत राहून कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निरीक्षकांना असतात. या अधिकाऱ्यांना इनकम टॅक्स ऑफिसर म्हणजेच आयटीओ असंही म्हटलं जातं. (Income Tax Inspector Salary)

आयकर निरीक्षकांच्या नोकरीसाठी एसएससी सीजीएल ही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. ही नोकरी महसूल तसंच वित्त खात्या अंतर्गत येते. त्यामुळे परीक्षार्थीला पदवी कुठल्या विषयातील आहे याचं बंधन नसलं तरी अर्थशास्त्र किंवा त्याच्याशी संबंधित पदवी असेल तर त्याचा फायदा होतो. एरवी कुठल्याही शाखेचा पदवीधर आयकर निरीक्षक पदासाठी अर्ज करू शकतो. ३० वर्ष वयोगटातील आतला भारतीय नागरिक यासाठी पात्र आहे. तुमच्या अर्जाच्या छाननीनंतर तुम्हाला लेखी परीक्षा, थेट मुलाखत आणि वादविवाद परीक्षेला सामोरं जावं लागतं. यातून यशस्वी झालेल्या उमेदावारांना कामकाजाचं प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतलं जातं.  (Income Tax Inspector Salary)

(हेही वाचा- Tirupati Prasadam : सरकारने मंदिरे हिंदू मंडळाच्या अखत्यारीत आणावीत; धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आवाहन)

आयकर निरीक्षकाची नोकरी ही भारतीय सरकारी नोकऱ्यांच्या वर्गवारीत सातव्या क्रमांकाची महत्त्वाची नोकरी आहे. इथं तुम्हाला मूलभूत मासिक वेतन ४४,९०० रुपये इतकं लागू होतं. पण, यात घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, शैक्षणिक शुल्क, प्रवास भत्ता असे भत्ते जमा होऊन तुमचा मासिक पगार साधारणपणे ६९,३९६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यातील निवृत्तीवेतनाचा हफ्ता वजा होता तुमच्या हातात ५८,००० रुपये इतका पगार येतो. अनुभव आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पगार वाढत जातो. (Income Tax Inspector Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.