HDFC Asset Management Share Price : एचडीएफसी कंपनीच्या या शेअरला जेफरीजनी दिलाय अपग्रेड 

HDFC Asset Management Share Price : जुलै महिन्यातील तिमाही निकालानंतर एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचा शेअर कशी कामगिरी करतोय?

183
HDFC Asset Management Share Price : एचडीएफसी कंपनीच्या या शेअरला जेफरीजनी दिलाय अपग्रेड 
HDFC Asset Management Share Price : एचडीएफसी कंपनीच्या या शेअरला जेफरीजनी दिलाय अपग्रेड 
  • ऋजुता लुकतुके

असेट मॅनेजमेंट कंपन्या या ग्राहकांचे किंवा गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या पसंतीच्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवून त्यांना चांगला परतावा कसा मिळेल याचा अभ्यास करणाऱ्या गुंतवणूक संस्था आहेत. ग्राहकांचे पैसे त्यांच्या जोखमीच्या तयारीनुसार या कंपन्या गुंतवतात आणि त्याचबरोबर या गुंतवणुकीवर नियमितपणे लक्षही ठेवतात. शिवाय या कंपन्या आपले स्वत;चे म्युच्युअल फंडही गुंतवणुकीसाठी बाजारात आणतात. बहुतेक सर्व बँकांनी आपल्या असेट मॅनेजमेंट कंपन्या स्थापन केल्या आहेत. एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी ही या क्षेत्रातील देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. या घडीला या कंपनी मार्फत ६.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात झाली आहे. (HDFC Asset Management Share Price)

(हेही वाचा- Kala Ghoda परिसरातील पाच मार्ग शनिवार, रविवार सायंकाळी सहा पासून राहणार बंद; या  रस्त्यांचे होणार सुशोभीकरण )

स्टेट बँक आणि आयसीसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड कंपनीनंतर एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचा क्रमांक लागतो. जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत कंपनीने दमदार कामगिरी शेअर बाजारात केली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअरही मागचे दोन महिने चढ्या भावात विकला जात आहे. शुक्रवारी (२० सप्टेंबर) शेअर बाजार बंद होताना या कंपनीचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात ४,३७४ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ५२ आठवडयातील आपली सर्वोत्तम किंमत ४,५४६ रुपयांच्या तो जवळ पोहोचला आहे. (HDFC Asset Management Share Price)

Pic Courtesy@Goolge 4

जुलै महिन्यात आलेल्या कंपनीच्या तिमाही निकालांनंतर जेफरीज् या जागतिक शेअर बाजार संशोधन संस्थेनं एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअर बद्दल आशादायक असल्याचा अहवाल सादर केला आहे. इतकंच नाही तर तिमाही निकालातील सकारात्मकता शेअर बाजारात पसरून हा समभाग येत्या वर्षभरात ४,९०० रुपयांचा नवीन उच्चांक गाठेल असा अंदाज जेफरीजनी व्यक्त केला आहे. (HDFC Asset Management Share Price)

(हेही वाचा- Election Commission चे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर)

कंपनीचा तिमाही निकाल आश्वासक होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी जास्त नफा कमावला आहे. कंपनीचा कर भरणीनंतर हातात उरणारा नफाही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला आहे. एकूणच मागच्या वर्षभरात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी वित्तीय संस्था एकत्र आल्यानंतर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. आणि वर्षभरात हा शेअर ७० टक्क्यांनी वार आला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या सुमारास हा शेअर २,५०० रुपयांच्या आसपास होता. तिथून या शेअरने यावर्षी नवीन तिमाहीत ४,५४६ अंशांचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. (HDFC Asset Management Share Price)

जेफरीजचा या शेअरविषयीचा अंदाज आश्वासक असला तरी मॉर्गन स्टॅनली आणि इतर काही संशोधन संस्थांनी शेअर ३,६५० पर्यंत खाली येऊ शकतो, असा इशाराही दिला आहे.  (HDFC Asset Management Share Price)

हेही पहा- 

(डिस्क्लोजर – शेअर बाजारातील गुंतवणूक तज्जांच्या सल्ल्यानेच करा, हिंदुस्थान पोस्ट वाचकांना शेअर गुंतवणुकीवर कुठलाही सल्ला देत नाही.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.