माझे काही सहकारी गेल्या रात्री बाबा विश्वनाथ धामला गेले होते. रात्री ते परतले. त्यांना मला तेथील प्रसाद दिला. तेव्हा तिरुमला मंदिराच्या प्रसादाची आठवण आली. त्यामुळे प्रसाद घेताना याविषयीच्या भावना आल्या होत्या. खरे तर धर्मग्रंथांत अशा भेसळीला पाप मानले गेले आहे. अशा घटना रोखण्याची गरज आहे. कदाचित देशातील प्रत्येक मंदिरात असेच घडत असावे. त्यामुळेच अशा प्रकरणात सखोल तपासाची गरज आहे, असे उद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी काढले आहेत. ते वाराणसी येथे बोलत होते. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (Banaras Hindu University) शताब्दी सभागृहात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुमलामध्ये अशुद्ध लाडू वाटपावर दु:ख व्यक्त केले आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होउ देणार नाही! राज ठाकरेंनी ठणकावलं)
सध्या तिरुपती मंदिरात मिळणारा प्रसादमच्या लाडूत चरबीयुक्त तूप असल्याचे प्रकरण चर्चेत आहे. दुसरीकडे कर्नाटकच्या हुबळीत केंद्रीय खाद्य मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, भारत सरकारने प्रसिद्ध तिरुपती प्रसादमच्या अपमानाचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा घेतला जाईल. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आता सविस्तर तपास होणार आहे.
केंद्रीय मंत्री बी.एल. वर्मा म्हणाले, भेसळ करणारे गुन्हेगार आहेत. त्यांनी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community