Crime News: अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय बालिकेवर अत्याचार!

76
Crime News: अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय बालिकेवर अत्याचार!
Crime News: अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय बालिकेवर अत्याचार!

खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने चार वर्षीय बालिकेवर अत्याचार (Crime News) केला आहे. मुलाने त्या मुलीस घराच्या छतावर नेत, सूर्य दाखवतो, खाऊ देतो, पैसे देतो, असे सांगत अतिप्रसंग केला. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल झाला आहे.

(हेही वाचा-Suicide News: कामाच्या अतिताणामुळे आणखी एकाने स्वतःला शॉक देत केली आत्महत्या!)

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलगी कुटुंबीयांसमवेत राहते. दरम्यान, संबंधित कुटुंबाच्या शेजारी तेरा वर्षे पाच महिन्यांचा अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी आला होता. या वेळी संबंधित चार वर्षीय मुलगी खेळत असताना मुलाने लहान मुलीला तुला सूर्य दाखवतो, खाऊ देतो, असे सांगत गच्चीवर नेले आणि अत्याचार केला. (Crime News)

(हेही वाचा-Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त)

मुलीला रात्री त्रास होऊ लागल्याने हा अतिप्रसंगाचा प्रकार असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेरावर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नयना कामठे करीत आहेत. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.