PM Narendra Modi Visit US : अमेरिकेकडून ३१ किलर ड्रोन खरेदी करणार

181

भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज MQ-9B स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र ड्रोन आणि लेझर-गाइडेड बॉम्ब खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. (PM Narendra Modi Visit US) या ड्रोनची किंमत सुमारे 3 अब्ज डॉलर्स आहे.

(हेही वाचा Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त)

मोदी आणि बायडेन यांनी भारत- अमेरिका संरक्षण सहकार्य रोडमॅपचे कौतुक केले. या रोडमॅप अंतर्गत, जेट इंजिन, दारुगोळा आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम यांसारखी अवजड उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जाणार आहेत. भारत अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार क्वाड कॉन्फरन्सनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका भागीदारी अतिशय मजबूत असल्याचे वर्णन केले. याशिवाय, परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याचे मार्ग, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक समस्या, रशिया-युक्रेन युद्ध आणि मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्यावरही द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली. (PM Narendra Modi Visit US) बैठकीत दोन्ही नेत्यांनी यूएस-इंडिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष असलेल्या लॉकहीड मार्टिन आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड या दोन कंपन्यांमधील C-130J सुपर हरक्यूलस विमानावरील टीमिंग कराराचे कौतुक केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.