Tirupati Prasadam : तिरूपती लाडू भेसळप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक, सरकार म्हणते…  

65
Tirupati Prasadam : तिरूपती लाडू भेसळप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक, सरकार म्हणते...  
Tirupati Prasadam : तिरूपती लाडू भेसळप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक, सरकार म्हणते...  

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji Temple) प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) चे कार्यकारी अधिकारी श्यामला राव (Shyamala Rao) यांनी प्रसाद तयार करण्यासाठी तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं सांगितलं. पण आधी फक्त वनस्पती तुपाच्या भेसळीबाबत सांगणाऱ्या श्यामला राव यांनी या तुपातही प्राण्यांची चरबी असल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान या प्रकरणामुळे आंध्रप्रदेश सरकार पेटून उठलं असून या सरकारने आपलं परखड मत मांडलं आहे.     (Tirupati Prasadam)

नारा लोकेश यांनी सांगितले की, एनडीडीबीच्या प्रयोगशाळेच्या अहवालामुळे भेसळ झाल्याचे करण्यात आलेले आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (CM Chandrababu Naidu) हे या वादाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. चंद्राबाबू यांनी सर्व पुराव्यानिशी याबाबतचा आरोप केला होता. आम्ही कुणालाही सोडणार नाही. तसेच हा विषय केवळ सीबीआयकडे सोपवून थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तिरुपती मंदिरातील लाडवांमध्ये वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी कुणालाही राज्य सरकार सोडणार नाही, तसेच कुणाचीही गय केली जाणार नाही, असा नारा लोकेश यांनी स्पष्टपणे सांगितले.   (Tirupati Prasadam)

(हेही वाचा – महिलांना वर्षाला 3 सिलिंडर मिळणार मोफत; Ajit Pawar यांची घोषणा)

हल्लीच आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या एनडीएच्या आमदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागच्या वायएसआरसीपी सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरालाही (Sri Venkateswara Swamy Temple) सोडण्यात आलं नाही. तिरुपतीमध्ये लाडू तयार करण्यासाठी दुय्यम साहित्याचा आणि प्राण्यांच्या चरबीचा (animal fat) वापर करण्यात आला, असा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून देशभरात वादाला तोंड फुटलं होतं.  (Tirupati Prasadam)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.