दोषींना फाशी द्या, हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचा हा कट; तिरुपती लाडू प्रकरणी Giriraj Singh यांची मागणी

110

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये सापडलेल्या माशांचे तेल आणि प्राण्यांची चरबी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी केली आहे. हिंदू धर्माला भ्रष्ट करून नष्ट करण्याचा हा कट असू शकतो, असे ते म्हणाले.

(हेही वाचा PM Narendra Modi Visit US : अमेरिकेकडून ३१ किलर ड्रोन खरेदी करणार)

तिरुपती मंदिराच्या प्रसाद प्रकरणावर ते म्हणाले, संपूर्ण देशात यावर चर्चा होईल. तिथे तुपाच्या रूपात जी चरबी वापरली गेली असेल, त्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे. हे सर्व कसे घडले? हे घाणेरडे काम कोणी केले, त्यामुळे एकीकडे सीबीआयकडून तपास व्हायला हवा, कारण याआधीही जगमोहन रेड्डी यांनी हिंदूंचे धर्मांतर करण्यास मदत केली होती. ते (Giriraj Singh) पुढे म्हणाले, माझी मागणी आहे की, हे केवळ भेसळीचे प्रकरण नाही, तर हिंदू धर्माला भ्रष्ट आणि नष्ट करण्याचेही प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणात फाशीची शिक्षा व्हायला हवी. अशा इतर संस्थांमध्येही जिथे देव-देवता आहेत. पूजा केली जाते, प्रसादासाठी तूप येते, त्याची प्रथम चाचणी करावी लागते आणि त्यासाठी मशीन आणि लॅबची आवश्यकता असते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.