रोजच्या धावपळीत हरवलेला आनंद, दडलेले बालपण आणि तारुण्य अनुभवण्यासाठी दक्षिण मुंबईतील श्रीमद् राजचंद्रजी मार्गावर (ऑपेरा हाऊस) ‘जॉय अव्हेन्यू’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात मुंबईकरांनी आज अलोट गर्दीसह प्रतिसाद दिला आणि कला, संगीत, खेळ, सांस्कृतिक, आरोग्यवर्धक उपक्रमांचा आनंद वेचला. (Joy Avenue)
सतत धावाधाव करणाऱ्या मुंबईकरांना निवांत आणि विरंगुळा मिळावा,या उद्देशाने धरमपूर येथील श्रीमद् राजचंद्र मिशनकडून (Shrimad Rajchandra Mission) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) सहाय्याने दक्षिण मुंबईतील श्रीमद् राजचंद्रजी मार्गावर (ऑपेरा हाऊस परिसर) ‘जॉय अव्हेन्यू’ (Joy Avenue) या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आज (दिनांक २२ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ वाजेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलिस, बेस्ट उपक्रम आणि लोढा फाउंडेशन (Lodha Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) आश्विनी जोशी, श्रीमद् राजचंद्र मिशनचे संस्थापक गुरुदेव राकेशजी, डी विभागाचे सहायक आयुक्त, शरद उघडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कला, संगीत, आरोग्य, खेळ, संस्कृती आदींचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात सर्व वयोगटातील शेकडो मुंबईकर सहभागी झाले.
खेळप्रेमींसाठी पिकलबॉल, स्केटबोर्डिंग, किकबॉक्सिंग, बॉक्स क्रिकेट, बोर्ड गेम इत्यादी विविध खेळ तर रिद्धिमिक योग, चेअर योग, टी मेडिटेशन, बॉक्सिंग आणि कार्डियो वर्कशॉप, महिलांसाठी स्वरक्षण वर्कशॉप इत्यादी विविध आरोग्यवर्धक उपक्रमही ‘जॉय अव्हेन्यू’मध्ये आयोजित करण्यात आले. साल्सा, गरबा, झुंबा आणि आफ्रिकन नृत्य शैलीवरील वर्कशॉपमध्ये युवा वर्गाने उत्साहात सहभाग नोंदवला. कलेची आवड असलेल्या मुंबईकरांनी मंडाला कला, कुंभारकाम, टॅटू आर्ट, फोटो बूथ, फूड स्टॉल आणि लाइव्ह संगीतमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. विविध संस्था, बचत गट देखील या उपक्रमात सहभागी झाले. महालक्ष्मी माऊली महिला बचत गटाच्या महिलांनी ‘जॉय अव्हेन्यू’मध्ये टेराकोटाच्या दागिन्यांचे प्रदर्शन मांडले. (Joy Avenue)
(हेही वाचा – Quran लिहून घेणारे महंमद पैगंबरांना लिहिता-वाचता येत नव्हते; कुराणमध्ये असंख्य चुका; पाकिस्तानी मौलवीनेच केली ईशनिंदा)
यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, जे स्वतः आनंदी असतात, तेच इतरांना आनंदी करू शकतात. ‘जॉय अव्हेन्यू’ सारखे उपक्रम राबविणाऱ्या श्रीमद् राजचंद्र मिशनचे मी अभिनंदन करतो. तसेच या सार्वजनिक जागेचा प्रभावी वापर करण्यासाठी श्रीमद् राजचंद्र मिशनसोबत काम करताना महानगरपालिकेलादेखील अभिमान वाटतो. भविष्यात संपूर्ण मुंबईत अशा उपक्रमांसाठी सहकार्य करण्यास महानगरपालिका प्रशासन उत्सूक असेल, असेही गगराणी यांनी नमूद केले.
(हेही वाचा – महापालिका आणखी ३७ नवे Balasaheb Thackeray Aapla Davakhana सुरू करणार; सध्या २४३ दवाखाने आहेत सुरू)
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Police Commissioner Vivek Phansalkar) म्हणाले की, सतत मोबाईलवर व्यस्त असलेल्या तरुण पिढीसाठी ‘जॉय अव्हेन्यू’ सारखे उपक्रम ताजेपणाची अनुभूती देतात. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे उपाध्यक्ष आत्मार्पित नेमिजी म्हणाले की, मुंबईकरांचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे. जे आपल्याला मिळतं त्याला सर्वोत्तम बनवतात तेच लोक आनंदी होतात. आनंद हा एक दृष्टिकोन आहे आणि ‘जॉय अव्हेन्यू’ सारखे उपक्रम आपल्याला तो दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत करतात, असे ते म्हणाले. (Joy Avenue)
मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्यांचा सन्मान
मुंबई महानगराच्या विकासात मोलाचे योगदान तसेच मुंबईकरांसाठी अविरत सेवा देणाऱ्यांचाही या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. रिक्षाचालक व शिक्षक दत्तात्रेय सावंत, गोवलिया टँक (नाना चौक) अग्निशमन केंद्राचे प्रभारी अग्निशमन अधिकारी श्री. रोहन मोरे, अग्निशामक, नीलेश पालवडे, ट्रॅफिक वॉर्डन वीरेंद्र वाडवाना, बस वाहक लहानू गोपाला नागरे, डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे मुख्य हवालदार, अनंत येनपुरे या सर्वांचा समाजासाठी निःस्वार्थ सेवेसाठी गौरव करण्यात आला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community