Sharad Pawar : ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ म्हणणाऱ्यांचे ढोंग उघडे पडले

231
Sharad Pawar : 'रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी' म्हणणाऱ्यांचे ढोंग उघडे पडले
Sharad Pawar : 'रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी' म्हणणाऱ्यांचे ढोंग उघडे पडले
  • सायली लुकतुके

देशातील राजकारणात गेल्या दशकभरात बरेच बदल झाले आहेत. त्या बदलांपैकी एक मोठे परिवर्तन म्हणजे धर्म राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या धार्मिक भावना उघडपणे व्यक्त केल्यानंतर आणि देशातील जनतेचा त्यांना पाठिंबाही मिळत आहे, हे पाहिल्यानंतर विरोधी पक्षही अडचणीत आले. गेल्या अनेक दशकांच्या राजकारणात हिंदू धर्म संपवण्यासाठीच कारस्थाने रचणाऱ्या काँग्रेसचे युवराजही त्याला अपवाद राहिले नाहीत. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वेगवेगळ्या मंदिरांच्या वाऱ्या सुरु केल्या होत्या. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधींच्याही पुढे जाऊन समाजवादी, नास्तिक, धर्मनिरपेक्षतावादी किंबहुना हिंदूविरोधी अशीच ज्यांची ओळख आहे, त्या पवार कुटुंबियांनाही अखेर मंदिरांच्या वाऱ्या कराव्या लागल्या आहेत.

(हेही वाचा – Quran लिहून घेणारे महंमद पैगंबरांना लिहिता-वाचता येत नव्हते; कुराणमध्ये असंख्य चुका; पाकिस्तानी मौलवीनेच केली ईशनिंदा)

सुप्रिया सुळे आणि शरद पवार देवाच्या दारी

अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले. शरद पवार गटाच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सुप्रिया सुळे (Supriya Sule) या त्यांच्या प्रचारसभांमध्ये त्या तुतारी चिन्हाचा ज्या प्रकारे प्रचार करत होत्या, त्यावरूनच वारे फिरले आहे, हे दिसून येत होते. ‘राम-कृष्ण हरी, वाजवा तुतारी’, अशी घोषणा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अनेक सभांमध्ये दिली. गेल्या वर्षीही त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन वारकरी महिलांसोबत भाकऱ्या थापल्या होत्या.

शरद पवार (Sharad Pawar) हे तर स्वतः आषाढी वारीत पायी चालतील, अशा प्रकारे वातावरण निर्माण केले गेले. यंदाच्या गणेशोत्सवात ३० वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. गेली अनेक वर्षे न चुकता इफ्तार पार्टीचे आयोजन करणारे शरद पवार (Sharad Pawar) यांना देवाच्या चरणी पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

(हेही वाचा – महापालिका आणखी ३७ नवे Balasaheb Thackeray Aapla Davakhana सुरू करणार; सध्या २४३ दवाखाने आहेत सुरू)

हा दुटप्पीपणाच !

एकीकडे हिंदू मतपेढीला आकर्षित करण्यासाठी ‘राम-कृष्ण-हरी’चा जयघोष करणारे शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्यासमोरच प्रभू श्रीरामाचा अवमानकारक उल्लेख होत असताना मात्र मूग गिळून गप्प बसले होते. संभाजी ब्रिगेडच्या व्यासपिठावर ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामाचा जो अपमान केला, त्यावर शरद पवार यांनी एका शब्दाने भाष्य केलेले नाही की साधा निषेधही नोंदवलेला नाही. सुप्रिया सुळे यांनाही त्याविषयी बोलावे वाटलेले नाही, हेही येथे अधोरेखित करावेसे वाटते.

एकीकडे मतांची बेगमी करण्यासाठी मंदिरांना भेटी द्यायच्या आणि दुसरीकडे विद्रोही विचारसरणीला खत-पाणी घालणाऱ्यांच्या व्यासपिठावर जायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. हिंदूंचा अवमान करणाऱ्यांचा कैवार घेणे सोडायचे नाही आणि हिंदूंची मते प्रभावित करण्यासाठी राम-कृष्ण-हरीही म्हणायचे. ज्ञानेश महाराव यांच्यावर आवश्यक ही कारवाई होईलच; पण त्या निमित्ताने पवार कुटुंबीय आणि अनेक तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी यांचे पितळ उघडे पडले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.