Dharavi Masjid प्रकरणी भडकाऊ पोस्ट व्हायरल करणाऱ्या तिघांना अटक

250

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीत बेकायदेशीरपणे मशीद (Dharavi Masjid) पाडल्याचे सांगत सोशल मीडियात पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे हजारो मुसलमान रस्त्यावर उतरले, त्यांनी जोरदार विरोध करत गोंधळ घातला. महापालिकेच्या वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी आता धारावी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवरही दंगल भडकवल्याचा आरोप आहे. या तिघांना भडकाऊ पोस्ट व्हायरल केल्या.

(हेही वाचा Quran लिहून घेणारे महंमद पैगंबरांना लिहिता-वाचता येत नव्हते; कुराणमध्ये असंख्य चुका; पाकिस्तानी मौलवीनेच केली ईशनिंदा)

धारावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शामियाना जंक्शन,  हिमालया हॉटेल जवळ 90 फीट रोड धारावी मुंबई येथे बेकायदेशीर जमाव जमवून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनावर समाजकंटकांनी दगडफेक करून वाहनाच्या समोरील बाजूची काच फोडून नुकसान केले, तसेच मुसलमानांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन करून वाहतुकीस बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून धारावी पोलीस ठाणे गु.र.क्र.847/2024 कलम 132, 189(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 324(3), 191(3) बी एन एस, 2023 सह कलम 37(1)(क), 135 मपोका, 1951 सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनीयम, 1984 सह कलम 7 क्रिमीनल अमेंडमेंट अक्ट, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. (Dharavi Masjid)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.