MukhyaMantr Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला विरोधक का घाबरले?

61
MukhyaMantr Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला विरोधक का घाबरले?
MukhyaMantr Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला विरोधक का घाबरले?

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली असल्यामुळे विधानसभेसाठी त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आघाडीच्या वर्तुळात यावेळी भाजपाला चांगलाच धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. फेक नॅरेटिव्हच्या जोरावर आघाडीने भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यापासून रोखले. खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलणं अतिशय फायदेशीर ठरतं, हे या निवडणुकीत सर्वांनाच अनुभवता आलं. आघाडीच्या फेक नॅरेटिव्हच्या तुलनेत भाजपाला आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना त्यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवता आली नाहीत किंवा फेक नॅरेटिव्ह खोडून काढता आलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी युतीचं जे नुकसान झालं, त्याची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारली आणि विधानसभेमध्ये ती कसर भरुन काढण्याची ग्वाही दिली. आघाडीतल्या नेत्यांप्रमाणे त्यांनी लोकांना दोष दिला नाही, लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला नाही. उलट आपल्याकडून काहीतरी राहून गेलं, हे मान्य करुन ते पुढच्या कामाला लागले. हे फडणवीसांचं वैशिष्ट्य आहे. (MukhyaMantr Ladki Bahin Yojana)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वाढती लोकप्रियता, नरेंद्र मोदी नावाचं वादळ आणि फडणवीसांची काम करण्याची शैली या जोरावर युती पुन्हा कामाला लागली आहे. अजित पवार फॅक्टरही यावेळी कामाला येणार असल्याची चर्चा आहे. पण महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्याची नव्हे, पण युतीला धक्का देऊन त्यांना लोकसभेप्रमाणे पिछाडीवर टाकण्याची खात्री आहे. जर युतीला बहुमत गाठता आलं नाही तर लहान सहान पक्षांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. यामध्ये राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पण भाजपाला व युतीला रोखण्याबाबत आघाडी समोर सर्वात मोठे संकट म्हणजे ‘लाडकी बहिण योजना’. आघाडीतल्या लोकांना असं वाटतं की लाडकी बहिण योजनेमुळे युतीला महिलांची मते मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. मुसलमान महिलाही यामुळे प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीपासूनच लाडकी बहिण योजनेच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. (MukhyaMantr Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – BMC Recruitment 2024 मधील कार्यकारी सहायक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध)

शरद पवार, उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांनीही या योजनेवर टीका केली आहे. या सर्वांना माहिती आहे की ही योजना चांगली आहे. या योजनेवर टीका करता येत नाही. म्हणून ते या योजनेची तुलना महिलांच्या सुरक्षेशी करतात. “महिलांवर अत्याचार होत असताना त्यांना पैसे कसले देताय, सुरक्षा द्या.” असे वक्तव्य आघाडीतले नेते करत आहेत. त्यांना लोकांची मानसिकता माहित आहे. लोकांना घाबरवलं तर लोक आपल्या बाजूने येतात, हा प्रयोग यशस्वी झाला असल्यामुळे पुन्हा तोच डाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेबाबत ज्या घटना घडल्या, त्या घटनांमुळे आघाडीला आपलं फेक नॅरेटिव्ह रुजवायला बळ मिळाले आहे. इतकंच काय तर लाडकी बहिण योजनेवर टीका करण्यासाठी आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील मैदानात उतरवले आहेत. लाडक्या बहिणीच्या पैशाला लाथ मारा असं वक्तव्य त्यांनी केलंय. राज्यातल्या महिलांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी केला आहे. तसेच जर कॉंग्रेसची सत्ता आली तर ही योजना बंद करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. याचा अर्थ कॉंग्रेस आणि सर्वच विरोधकांना लाडकी बहिण योजनेची भीती वाटत आहे आणि म्हणूनच याचा भाजपाला व युतीला फायदा होऊ नये यासाठी ते सतत लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता पितृपक्षानंतर नवरात्री सुरु होणार आहे. सरकारला नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा जागर म्हणून लाडकी बहिण योजना तळागाळात पोहोचवण्याची चांगली संधी आहे. असे झाल्यास विरोधकांचं फेक नॅरेटिव्ह गळून पडेल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.