महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ मानले जाणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर (Saptashrungi Gad) दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगगड देवी भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोमवारीपासून चार दिवस सप्तशृंगी घाट भाविकांसाठी बंद राहणार आहे. 23 ते 26 सप्टेंबरपर्यंत 4 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद रहाणार आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी घाटात दरड प्रतिबंधक जाळी बसविण्याचे काम पर्यटन तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यात येत असून हे काम सध्या सुरू असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली आहे. त्यामुळे, सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या किंवा या गडाकडे Saptashrungi Gad) घाटातून जाणाऱ्या भाविकांनी याची नोंद घेऊन आपला प्रवासाचा मार्ग बदलला पाहिजे. महाराष्ट्रासह देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवींची मनोभावे पूज व आरती करुन 9 दिवस जागरण करण्यात येते. त्यामुळे, नवरात्र व कोजागिरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर हे काम सुरू करण्यात आले आहे. घाटातील सैल दगडही काढले जाणार आहेत, अनेकदा दरड कोसळून वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीमध्ये गडावर येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community