Pune-Bangalore National Highway Bypass वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 300 कोटी मंजूर

56
Pune-Bangalore National Highway Bypass वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 300 कोटी मंजूर
Pune-Bangalore National Highway Bypass वरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 300 कोटी मंजूर

पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. दरम्यान पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.  (Pune-Bangalore National Highway Bypass)

पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam NHAI), महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar), महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट ( मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला.

(हेही वाचा – MukhyaMantr Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला विरोधक का घाबरले?)

अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर शनिवारी या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचा – चिपळूणमध्ये राजकीय उलथापालथ? Bhaskar Jadhav यांचा मुलगा भेटला अजित पवारांना)

पुणे-बेंगळुरू बायपासची वस्तुस्थिती

  • गेल्या पाच वर्षात सुमारे २० लाख वाहनांची वाढ.
  • पुण्यात २०१८ मध्ये पुण्याची वाहनसंख्या ५२ लाख होती, ती २०२४ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
  • दररोज १३०० नवीन वाहनांची भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
  • पुण्याला नसणारे रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो.
  • पुणे-बेंगळुरू रस्ता सध्या जरी बायपास म्हणून असला तरी तो सोलापूर, सासवड, सातारा, मुंबईकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता रिंग रोड म्हणून वापरला जातो.
  • या बासपायची निर्मीती १९९४ मध्ये दोन लेनचा हायवे म्हणून करण्यात आली होती.
  • हा बायपास २००० मध्ये दोन लेनचा रस्ता वाढवून चार लेनचा करण्यात आला.
  • तसेच २०१० मध्ये सहा लेनचा रस्ता प्रस्तावीत झाला असून या सहा लेनची कामे अजून ही काही ठिकाणी प्रगती पथावर आहे.
  • गेल्या तीस वर्षात नऱ्हे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी, आणि किवळे या भागांमध्ये साधारणतः १० लाखांपेक्षा जास्त नागरीक वास्तव्यास आहेत.
  • त्याचप्रमाणे या दक्षिण भागामध्ये आयटी पार्क विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक व शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत.
  • दररोज साधारण २ ते ३ लाख नागरिक हायवेचा वापर करतात. तर, पिक हवर्सला १५ ते २५ हजार लोक या रस्त्याचा वापर करतात.
  • या रस्त्यावर गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक अपघात झालेले असुन त्यामध्ये ६८ लोकांनी जीव गमावलेला आहे व ५४ लोक गंभीर जखमी झालेले आहेत.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.