मुंब्य्रात (mumbra) ३० वर्षीय जुन्या इमारतीतील सदनिकेचे प्लास्टर कोसळून (Slab Collapse) पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघे जखमी असून जखमींमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर मुंब्य्राच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उनेजा शेख असे पडझडीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून झोपेतच तिच्यावर काळाने घाला घातला आहे.
(हेही वाचा-Assembly Elections : मुख्यमंत्री पदाभोवती राज्याचे राजकारण)
सदरच्या दुर्घटनेने मुंब्य्रामधील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा (Slab Collapse) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंब्य्राच्या जीवनबाग परिसरात असलेल्या पाच मजली बानू टॉवरच्या बी विंगमध्ये तळमजल्यावरील अस्लम कुरेशी यांच्या घरात उमर शेख भाड्याने राहतात. शेख कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या स्वयंपाकघराच्या छताचे प्लास्टर कोसळले. यावेळी स्वयंपाकघरात झोपलेल्या उनेजा हिला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तिला तातडीने मुंब्य्राच्या रुग्णालय येथे नेले असता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
(हेही वाचा-AI म्हणजे अमेरिका-इंडिया; जगाची नवीन ताकद; PM Narendra Modi यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली नवी संकल्पना)
यासोबत दुर्घटनेत उमर शेख (२३), मुस्कान शेख (२१) व एक वर्षांच्या इजान शेख या तिघांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त बाळू पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. या घटनेने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Slab Collapse)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community