Police: पोलिसच करताहेत विनातिकीट प्रवास! रेल्वे टीसींनी केली नाराजी व्यक्त

456
Police: पोलिसच करताहेत विनातिकीट प्रवास! रेल्वे टीसींनी केली नाराजी व्यक्त
Police: पोलिसच करताहेत विनातिकीट प्रवास! रेल्वे टीसींनी केली नाराजी व्यक्त

रेल्वेतून (Mumbai Local) मोठ्या प्रमाणात पोलिस (Police) विनातिकीट प्रवास करत आहेत. दंड ठोठावल्यानंतर तो भरण्यास नकार दिलाच, शिवाय आम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही पोलिसांनी दिल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सणासुदी व सुट्यांत विशेष तिकीट तपासणी मोहीम देशभर राबविण्यात येणार आहे. त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांसोबतच इतर प्रवाशांवरही कारवाई करण्यात येईल.

(हेही वाचा-Nanded मध्ये भीषण अपघात! भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक, २० भाविक जखमी)

मध्य रेल्वे (Central Railway) विभागाच्या तिकीट निरीक्षकांनी सांगितले की, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवास करतात. तेच सर्वाधिक त्रास देतात. कारवाई केल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करतात. खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकीही देतात, असे रेल्वे तिकीट तपासनीस संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विनातिकीट प्रवास कणाऱ्या शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांकडून आम्ही दंड वसूल केला. यावेळी प्रवाशांनीही साथ दिली. पोलिसांविरुद्ध कारवाई पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. (Police)

(हेही वाचा-Saptashrungi Gad चार दिवस भाविकांसाठी राहणार बंद)

३.६१ २४ कोटी लोकांना २०२३-२४ वर्षात विनातिकीट प्रवास करताना पकडले आहे. २,२३१ कोटी रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे. (Police)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.