पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या अमेरिका (United States) दौर्यावर आहेत. अमेरिकेने भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. या वस्तू भारतातून तस्करीच्या माध्यमातून बाहेर गेल्या होत्या. मोदी पंतप्रदान झाल्यापासून आतापर्यंत भारताने ६४० प्राचीन वस्तू परत मिळवल्या आहेत. (Artefacts Returned)
(हेही वाचा – Police: पोलिसच करतायत विनातिकीट प्रवास! रेल्वे टीसींनी केली नाराजी व्यक्त)
वर्ष २०२१ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांना १५७ वस्तू परत करण्यात आल्या होत्या. त्यांत १२ व्या शतकातील नटराज मूर्तीचाही समावेश होता. यानंतर वर्ष २०२३ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यानंतर अमेरिकेने १०५ वस्तू भारताला परत केल्या. अशा प्रकारे आतापर्यंत एकट्या अमेरिकेकडून ५५९ प्राचीन आणि मौल्यवान वस्तू परत करण्यात आल्या आहेत. अमेरिकेखेरीज ब्रिटनमधून १६ आणि ऑस्ट्रेलियातून १४ कलाकृती परत करण्यात आल्या आहेत.
Deepening cultural connect and strengthening the fight against illicit trafficking of cultural properties.
I am extremely grateful to President Biden and the US Government for ensuring the return of 297 invaluable antiquities to India. @POTUS @JoeBiden pic.twitter.com/0jziIYZ1GO
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2024
या वस्तूंत वाळू काश्मापासून तयार ११-१२व्या शतकातील अप्सरेची मूर्ती, मध्य भारतात सापडलेली जैन तीर्थंकरांची १५-१६व्या शतकातील कांस्य मूर्ती, ३-४थ्या शतकातील सिरॅमिक फुलदाणी, श्री भगवान गौतम बुद्धांची १५-१६व्या शतकातील उभी मूर्ती, इसवी सनपूर्व २०००-१८०० या काळातील कांस्याची मानवरूपी रचना यांच्यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आहेत. तस्करीविरुद्धचा लढा अधिक तीव्र होत आहे, असेही ते म्हणाले. (Artefacts Returned)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community