Gujarat Crime: सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाने केला अतिप्रसंग; नंतर केली तिची हत्या!

130
Gujarat Crime: सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाने केला अतिप्रसंग; नंतर केली तिची हत्या!
Gujarat Crime: सहा वर्षाच्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाने केला अतिप्रसंग; नंतर केली तिची हत्या!

पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने गळा दाबून हत्या (Gujarat Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील ही घटना आहे. या मुख्याध्यापकानं त्याच्या कारमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी मुख्याध्यापकानं तिची गळा दाबून हत्या केली. नंतर शाळेच्याच मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिल्याचा घटनाक्रम पोलीस तपासात उघड झाला आहे.

आईने विश्वासाने मुलीला मुख्याध्यापकासोबत पाठवलं पण…
नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या चिमुकलीची आई तिला घेऊन निघाली असता शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा मुलीला आपण सोडतो, असं म्हणून त्यानं त्या चिमुकलीला कारमध्ये बसवलं. आईनंही विश्वासानं मुलीला मुख्याध्यापकासोबत पाठवलं. दरम्यान, मुख्याध्यापकानं वाटेतच कारमध्ये त्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं विरोध करत आरडाओरड करायला सुरुवात केली. ते पाहून तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकाने त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. (Gujarat Crime)

नेमकं काय घडलं?
मुलगी शाळा सुटूनही घरी न आल्यामुळे पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला.यासंदर्भात दाहोदचे पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “या प्रकरणाची १० वेगवेगळ्या पोलीस पथकांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर काही बाबी आम्हाला स्पष्ट झाल्या. यानुसार, ती मुलगी शेवटची शाळेच्या मुख्याध्यापकासोबतच दिसली होती हे नक्की होतं. तिच्या आईनं तिला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मुख्याध्यापकासोबत पाठवलं. पण इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबानीनुसार गुरुवारी ती मुलगी शाळेत आलीच नाही. सुरुवातीला मुख्याध्यापकानं सांगितलं की शाळेत सोडल्यानंतर मुलगी कुठे गेली हे त्याला माहितीच नाही. पण नंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.” (Gujarat Crime)

आरोपी मुख्याध्यापकाला त्या दिवशी शाळेत पोहोचायला नेहमीपेक्षा जास्त उशीर लागल्याचं लक्षात आल्यामुळेही पोलिसांचा संशय बळावला. दिवसभर मुलगी शाळेतही नव्हती आणि शाळेच्या मागच्या बाजूला तिचा मृतदेहही दिसला नाही असं शाळेतील चौकशीवरून पोलिसांना समजलं. पण एका विद्यार्थ्यानं पोलिसांना सांगितलं की मुलीच्या चपला त्यानं मुख्याध्यापकाच्या कारमध्ये पाहिल्या होत्या. शिवाय, आरोपी मुख्याध्यापक त्या दिवशी सगळ्यांच्या नंतर शाळेतून निघाला, असंही पोलिस तपासात उघड झालं होतं. (Gujarat Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.