-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेतील नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर (Dr. Prachi Jambhekar) यांची नियुक्ती आता मुंबई महापालिकेच्या उपायुक्त या पदावर करण्यात आली आहे. डॉ. प्राची जांभेकर या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असून त्यांची नियुक्ती महापालिकेच्या संचालक (नियोजन) या पदावर करण्यात आलेली आहे. मात्र आता त्यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जांभेकर यांची प्रतीनियुक्तीने उपायुक्त (सुधार) या हे पदावर नियुक्ती करण्याचे प्रथम शासनाचे आदेश होते. परंतु पुन्हा हे आदेश बदलून त्यांची नियुक्ती उपायुक्त पदी करण्याचे सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
डॉ. प्राची जांभेकर, (Dr. Prachi Jambhekar) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी)असून सध्या त्या गट अ सध्या कार्यरत संचालक (नियोजन) या पदावरून , उपायुक्त (सुधार), या रिक्त पदावर प्रथमतः १ वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असल्याचे पाहिल्या शासन आदेशात म्हटले होते. पण मग ते नियुक्ती आदेश सुधारीत करून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त या पदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. डॉ. जांभेकर यांना प्रतिनियुक्तीच्या पदी रूजू होण्याकरीता आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांनी त्यांना कार्यरत पदावरुन कार्यमुक्त करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुधार रमेश पवार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदावर या पदाचा प्रभारी पदभार उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आजवर या पदावर सनदी अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाते. परंतु, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या निधी चौधरी यांच्यापासून ही प्रथा बदलली गेली आणि प्रतिनियुक्तीवर उपायुक्त पदावर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावू लागली. परंतु, महापालिकेचा हा निर्णय चुकीचा असल्याने निधी चौधरी यांना उपायुक्त ऐवजी सह आयुक्त असे सुधारित पदनाम करावे लागले होते. त्यानंतर सहआयुक्त या पदावर त्यानंतर आशुतोष सलील, गंगाथरण यांची नियुक्ती पुढे झाली. महापालिकेत उपायुक्त (विशेष ) या पदावर आणि सहआयुक्त (सुधार) ही दोन पदे यापूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरली जात होती. (Dr. Prachi Jambhekar)
(हेही वाचा- Mumbai Ring Road : मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा; ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी)
मात्र उपायुक्त सुधार या पदावर आजवर शासना कडून प्रतिनियुक्तीद्वारे अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.त्यामुळे या व्यक्त पदावर महापालिकेत यापूर्वीच संचालक (नियोजन) या पदावर प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ. प्राची जांभेकर (Dr. Prachi Jambhekar) यांची वर्णी आता उपायुक्त या पदावर लावण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास खात्याने याबाबत या नियुक्तीचे पत्र १९ सप्टेंबर२०१४ रोजी जारी केले असून या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना देण्यात आलेल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community