काश्मीरमधील Doodhpathri हे ठिकाण कशासाठी ओळखलं जातं?

124
काश्मीरमधील Doodhpathri हे ठिकाण कशासाठी ओळखलं जातं?

काश्मीरमधील दूधपात्री (Doodhpathri) हे ठिकाण त्याच्या आकर्षक नावासाठी, नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तिथल्या ऍडव्हेंचर्ससाठी प्रसिद्ध आहे.

दूधपात्री हे नाव कसं पडलं?

दूधपात्री या काश्मिरी नावाचा “व्हॅली ऑफ मिल्क” असा अर्थ होतो. हे नाव शालिगंगा नदीवरून पडलं आहे. ही नदी दरीतून वाहते आणि कधीकधी दुधाळ दिसते.

दूधपात्री इथलं नैसर्गिक सौंदर्य

दूधपात्री (Doodhpathri) ही हिमालयातल्या पीर पंजाल पर्वतश्रेणीतील वाटीच्या आकाराची दरी आहे. हे ठिकाण खास करून त्याच्या उतार असलेल्या गवताळ प्रदेश, रंगीबेरंगी फुलं आणि उंच झाडांसाठी ओळखले जाते.

(हेही वाचा – Advocate General of maharashtra : कोण आहेत महाराष्ट्राचे महाअधिवक्ता?)

दूधपात्री या ठिकाणी अनेक ऍडव्हेंचर पॉईंट्स आहेत. जसे की,

  • कॅम्पिंग :

डक्सम ट्रेल आणि सिंथन पास ही ठिकाणं कॅम्पिंगसाठी चांगली आहेत.

  • ट्रेकिंग :

हिल-टाउन हे ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे.

  • भटकंती :

तांगनारच्या दऱ्या भटकंती करण्यासाठी आणि सहलीसाठी चांगल्या आहेत.

(हेही वाचा – Toll: वरळी सी लिंक आणि समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये घोळ! राज्य सरकारची मोठी कारवाई)

  • नदी प्रेक्षणीय स्थळ :

शालिगंगा नदी हे इथलं मुख्य आकर्षण आहे. दूधपात्रीशी संबंधित अनेक दंतकथा आहेत. त्यांमध्ये या भागाला भेट दिलेल्या एका सूफी संताबद्दलचा उल्लेख आहे. दूधपात्री (Doodhpathri) म्हणजेच व्हॅली ऑफ मिल्क हे जम्मू आणि काश्मीर राज्यातलं एक पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन आहे. दुधपात्री हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम नावाच्या जिल्ह्यात वसलेलं आहे.

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ८,९५७ फूट एवढ्या उंचीवर आहे. तसंच ते राज्याची राजधानी श्रीनगरपासून ४२ किलोमीटर अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय बडगामपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. दूधपात्री येथे कुरणातून वाहणारं पाणी दुरूनच दुधाळ स्वरूपाचं दिसतं. हे पाणी वर्षभर अतिशय थंड असतं.

इथल्या विस्तीर्ण कुरणांवरचं हिरवंगार गवत आणि मोठ्या दगडांवरून वाहणारे चांदीसारखे चमकणारे झरे हे या ठिकाणचं सौंदर्य आणखी वाढवतात. दूधपात्री म्हणजे चँगपर्यंत विविध रंगांच्या फुलांच्या शालीसारखं पसरलेलं एक गवताळ प्रदेश आहे. इथलं प्रसिद्ध असलेलं तोसामैदान हे दूधपात्रीच्या पश्चिमेला आहे.

(हेही वाचा – Malabar Hill : मुंबईतलं प्रशस्त ठिकाण! का करतं हे ठिकाण लोकांना आकर्षित?)

दूधपात्रीची भौगोलिक स्थिती

दूधपात्री (Doodhpathri) हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २,७३० मीटर म्हणजेच ८,९५७ फूट एवढ्या उंचीवर आहे. हे ठिकाण हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगेमध्ये एका वाडग्याच्या आकाराच्या दरीमध्ये आहे. ही बर्फाच्छादित पर्वत, पाइन फिर आणि देवदार वृक्षांच्या कुरणांनी झाकलेली अल्पाइन दरी आहे. हिवाळ्यात हे संपूर्ण कुरण बर्फाने झाकलेलं असतं. तर वसंत ऋतू आणि उन्हाळ्यामध्ये या कुरणावर डेझी, फॉरगेट-मी-नॉट्स आणि बटर कप यांसारख्या जंगली फुलांची झपाट्याने वाढ झालेली दिसून येते.

  • दूधपात्री इथली लोकसंख्या

दूधपात्री (Doodhpathri)  येथे कायमस्वरूपी वस्ती करता येत नाही. कारण हिवाळ्यात होणाऱ्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे ठिकाण राहण्यायोग्य नसतं. उन्हाळ्यामध्ये बडगाम जिल्ह्याच्या मैदानातून मेंढपाळ आपली गुरं चरण्यासाठी इथे आणतात. जवळजवळ सहा महिने ते दूधपात्री येथे राहतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.