Horniman Circle Garden ची काय आहेत वैशिष्ट्ये?

22

हॉर्निमन सर्कल गार्डन (Horniman Circle Garden) हे दक्षिण मुंबई इथे असलेलं एक मोठं गार्डन आहे. या गार्डनचं क्षेत्रफळ १.०१ हेक्टर म्हणजेच २.५ एकर एवढं आहे. हे गार्डन मुंबईच्या फोर्ट या भागात वसलेलं आहे. तसंच हे देशाच्या प्रमुख बँकांचं स्थान असलेल्या कार्यालय संकुलांनी वेढलेलं आहे.

तटबंदीच्या शहराच्या मध्यभागी भव्य इमारती असलेली एक मोठी मोकळी जागा म्हणून डिझाइन केलेलं हे क्षेत्र १८व्या शतकात बॉम्बे ग्रीन म्हणून ओळखलं जात होतं. १९४७ साली भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर, भारतीय स्वातंत्र्याचे समर्थन करणारे त्या काळच्या बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे संपादक बेंजामिन हॉर्निमन यांच्या सन्मानार्थ या क्षेत्राचं नाव बदलण्यात आलं.

(हेही वाचा – Bhuleshwar Temple चे ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व काय आहे?)

हॉर्निमन सर्कल गार्डनचा इतिहास

१८४२ साली हा परिसर नारळाच्या टरफलांचा आणि कचऱ्याचा ढिगारा होता. तत्कालीन पोलीस आयुक्त चार्ल्स फोर्जेट यांनी बॉम्बे ग्रीनला इमारतींनी वेढलेल्या एका सर्कलमध्ये रूपांतरित करण्याचा विचार केला. त्यांच्या या विचाराला गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि सर बार्टल फ्रेरे यांनी पाठिंबा दिला. (Horniman Circle Garden)

त्यानंतर १८६९ साली या गार्डनची योजना तयार करण्यात आली होती. पुढे १८७२ साली हे गार्डन बांधून पूर्ण करण्यात आलं होतं. या सर्कल गार्डनच्या चारही बाजूंनी सुसज्ज पायवाट तयार केलेली होती. तसंच वेगवेगळी झाडं लावली होती. त्याच्या मध्यभागी एक शोभिवंत कारंजे ठेवण्यात आलं. पण त्याची जागा आधुनिक आर्ट डेको लोखंडी पाईप डिझाइनने घेतली होती.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या पूर्वजांनी केलेली राष्ट्रघातकी पातके)

हॉर्निमन सर्कल गार्डन इथे होणारे कार्यक्रम

हॉर्निमन सर्कल गार्डन येथे दरवर्षी सुफी आणि मायस्टिक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केले जातात. याव्यतिरिक्त या गार्डनमध्ये अनेक संगीत आणि नृत्य मैफिली आयोजित केल्या जातात. हे ठिकाण काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या ठिकाणांपैकी एक आहे. (Horniman Circle Garden)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.