Tirupati Balaji Laddu Adulteration प्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची Supreme Court मध्ये मागणी

देशभरात विविध स्तरातून मंदिरे आणि प्रसादांचे पावित्र्य संरक्षित करण्याची मागणी होत असताना तिरुमला तिरुपति देवस्थानममधील लाडू भेसळप्रकरणाच्या (Tirupati Balaji Laddu Adulteration) चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली आहे.

125

प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Laddu Adulteration) वाटण्यात येणाऱ्या लाडू प्रसादाच्या तुपात प्राण्याची चरबी आणि माशांचे तेल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता सरकारने तातडीने यात सुधारणा करत प्रसादाचे पावित्र्य टिकवून राहील याची खबरदारी घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे. तरी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता समिती स्थापन करावी, अशी मागणी भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेच्याद्वारे केली आहे.

काय म्हटले आहे याचिकेत? 

भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांची उच्च आणि स्वतंत्र यंत्रणेकडून तपास व्हावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली समिती स्थापन करावी आणि या समितीच्या मार्फत तपास करण्याचे निर्देश द्यावे. लॅबमधील लाडूंच्या (Tirupati Balaji Laddu Adulteration) चाचणीचा अहवाल आणि त्या चाचणीत वापरण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्याच्या स्त्रोताबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत.

(हेही वाचा Waqf Board Law वर चर्चा करण्यासाठी २६ तारखेपासून ५ राज्यांमध्ये बैठक)

देशभरात विविध स्तरातून मंदिरे आणि प्रसादांचे पावित्र्य संरक्षित करण्याची मागणी होत असताना तिरुमला तिरुपति देवस्थानममधील लाडू भेसळप्रकरणाच्या (Tirupati Balaji Laddu Adulteration) चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. तिरुपति मंदिरात आता लाडू बनविण्यासाठी कर्नाटक दूध महासंघाच्या ‘नंदिनी’ या तुपाचा वापर केला जात आहे. ३५० टन तुपाचा पुरवठा करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली आहे. ‘आता प्रसादाचे पावित्र्य आणि शुद्धता पुनर्स्थापित करण्यात आली आहे. आता लाडू ‘निष्कलंक’ असून, त्याचे पावित्र्य राखण्यास कटिबद्ध आहोत,’ असे ‘टीटीडी’ने स्पष्ट केले आहे. प्रसाद वितरणाच्या ठिकाणी अन्नचाचणी प्रयोगशाळा उभाराव्यात, अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. प्रसादात वापरण्यात आलेल्या अन्नघटकांचा उल्लेख दर्शनी भागात करावा. त्यामुळे प्रसादाचा दर्जा उत्तम राहील, असे प्रभू यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.