Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता

258
Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता
Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान ‘लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा तिसरा हप्ता कधी मिळणार, याकडे महिला वर्गाचे डोळे लागले आहेत अशातच या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून तिसरा हप्ता देत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी (२३ सप्टेंबर) बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. (Mukhyamantri mazi ladki bahin yojana)

२९ सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या २९ सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या २९ सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

(हेही वाचा – निवडणुकीपूर्वी Rohit Pawar यांना धक्का; ‘हा’ जवळचा नेता करणार भाजपामध्ये प्रवेश )

३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Mukhyamantri mazi ladki bahin yojana)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या पूर्वजांनी केलेली राष्ट्रघातकी पातके)

आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.