तिरुपती देवस्थान मंडळ सदस्य Milind Narvekar यांच्या राजीनाम्याची शिवराज्याभिषेक समितीची मागणी

240
तिरुपती देवस्थान मंडळ सदस्य Milind Narvekar यांच्या राजीनाम्याची शिवराज्याभिषेक समितीची मागणी
तिरुपती देवस्थान मंडळ सदस्य Milind Narvekar यांच्या राजीनाम्याची शिवराज्याभिषेक समितीची मागणी
  • खास प्रतिनिधी 

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांची चरबी व माशांचे तेल (fish oil) आढळून आले आहे. याचा तीव्र निषेध शिवराज्याभिषेक समिती, किल्ले रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केला तसेच या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मंडळावर

प्रसादात गोमांस आणि माशांचे तेल मिसळणे हा समस्त हिंदूं धर्मियांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून या चीड आणणाऱ्या या घटनेवर प्रतिक्रिया घेण्यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि शिवसेना उबाठा आमदार मिलिंद नार्वेकर तसेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याच तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्त समितीवर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नार्वेकर निवडून आले.

(हेही वाचा – Israel and Hezbollah Conflict : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला; 100 लोकं ठार, 300 हून अधिक जखमी)

भावना लक्षात घेऊन राजीनामा द्यायला हवा

या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याशी संपर्क केला होता मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवराजाभिषेक समितीचे सुनील पवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळालाच या प्रसाद भेसळ प्रकरणी दोषी ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. खरे तर मिलिंद नार्वेकर यांनी हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन स्वतः या मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यायला हवा,” अशी मागणी पवार यांनी केली.

“अशा प्रकारची भेसळ जसे डुकरांचे मांस त्यांच्या शिरखुर्मामध्ये आढळले असते तर मुस्लिम समाजाने या मंडळाला जीवंत ठेवले असते का?” असा संतप्त सवालही पवार यांनी केला.

..यासाठीच ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना

हिंदूंच्या मंदिरांच्या बाहेर विक्री होणारे लाडू, पेढे देवाच्या चरणी अर्पण केल्यावर ते प्रसाद म्हणून वाटले जातात. मात्र या प्रसादामध्ये भेसळ होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेच हिंदूंच्या मंदिरांमध्ये अर्पण केले जाणारे पूजा साहित्य आणि प्रसाद यांचे पावित्र्य टिकून रहावे, त्यांची शुद्धता जपली जावी, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दोन महिन्यांपूर्वी ‘ओम प्रतिष्ठान’ची स्थापना केली, त्यावेळी मंदिरांच्या बाहेर विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्यास सुरुवात केली. याविषयाची गांभीर्य वेळीच लक्षात घेणे अपेक्षित होते, कारण आता जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादात (Tirupati Laddu Prasadam) प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल सापडले. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामळे ‘ओम प्रमाणपत्रा’च्या चळवळीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

(हेही वाचा – ‘मी मुस्लिम-महाराष्ट्रीयांना व्यवसाय देत नाही’ या आक्षेपार्ह विधानानंतर पश्चिम रेल्वेचे TC Ashish Pande निलंबित)

प्रसादात भेसळ; प्रयोगशाळेचा अहवाल

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाचे (Tirupati Laddu Prasadam) पावित्र्य आणि शुद्धतेबाबतचा वाद पेटला आहे. तेलुगू देसम पक्षा (टीडीपी) च्या दाव्यानुसार, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टला प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादम बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता त्यात प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाने दावा केला आहे की, गुजरातमधील एका प्रयोगशाळेत या तुपाचे नमुने तपासण्यात आले. टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमणा रेड्डी यांनी १९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला. त्यांनी सांगितले की, हे नमुने गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळा, NDDB (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) आणि CALF (सेंटर फॉर अॅनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड) यांना ९ जुलै २०२४ रोजी पाठवण्यात आले होते. १७ जुलै रोजी हे अहवाल प्राप्त झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.