Water Pipe Lines : भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘त्या’ दोन्ही जलवाहिन्यांची ठाण्याला होते अडचण

397
Water Pipe Lines : भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 'त्या' दोन्ही जलवाहिन्यांची ठाण्याला होते अडचण
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील दोन जलवाहिनी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात ठाणे परिसरात जात असून या दोन्ही जलवाहिनींचा अडसर आता ठाणे महापालिकेला होऊ लागला आहे. ठाण्याच्या वाढत्या विकासामुळे या दोन्ही जलवाहिनींचा प्रमुख अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे या दोन्ही जलवाहिनी जमिनीखाली टाकण्यात याव्या अशाप्रकारची मागणी ठाणे महापालिकेच्यावतीन मुंबई महापालिकेकडे होत आहे. (Water Pipe Lines)

(हेही वाचा – पीएच.डी. करणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार; आंदोलन मागे)

मुंबई महापालिकेच्या बॉम्बे २ आणि बॉम्बे ३ या दोन मुख्य जलवाहिन्या भातसा या धरणातून मुंबई शहरापर्यंत पाणी वाहून आणतात. या जलवाहिन्या कशेळी खाडीजवळ ठाणे या शहरात प्रवेश करतात आणि पुढे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूस माजीवडे येथे भूमिगत होऊन पुढे मुलुंड जकात नाक्याजवळ हरी ओम नगर येथे मुंबई शहरामध्ये प्रवेश करतात. गेल्या काही दशकांमध्ये ठाणे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ठाणे शहरांनमधील या जलवाहिन्यांमुळे विविध विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून या दोन्ही जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याबाबत विनंती वजा सूचना केल्याची माहिती मिळत आहे. (Water Pipe Lines)

(हेही वाचा – Cabinet Decision : राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण)

परंतु, पूर्व द्रुतगती महामार्गालगत दोन्ही बाजूस झालेल्या प्रचंड विकासकामांमुळे आणि प्रचंड रहदारीच्या समस्येमुळे या दोन्ही जलवाहिन्या मुंबई शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत न करता, अधिक खोलवर सरकविणे शक्य नसल्याचे महापालिकेने ठाणे महापालिकेला कळवले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने जल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची पिण्याच्या पाण्याची सतत वाढणारी मागणी लक्षात घेता भातसा या धरणातून अपेक्षित वाढीव पाणीपुरवठ्याच्या अभ्यास करून या दोन्ही जलवाहिन्यांचे पाणी अन्य मार्गाने वळवण्याचा दृष्टिकोनातून टनेल स्वरूपात भूमिगत जलवहिनी बांधण्याचा विचार केला आहे. (Water Pipe Lines)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.