अयोध्यास्थित अमृत बॉटलर प्रायव्हेट लिमिटेड या कोका कोला कंपनीचा (Coca Cola) कारखाना असलेला ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये कंपनीच्या हिंदू कर्मचाऱ्यांच्या हातातून गंडेदोरे जबरदस्तीने काढून घेतले जात आहेत, त्यानंतरच त्यांना कारखान्यात प्रवेश देतात.
धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन
स्वदेशमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या घटनेमुळे कर्मचारी आणि स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक याला धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन मानत आहेत, कारण अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मनगटावरील गंडेदोरे काढून टाकण्यास जबरदस्ती करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. (Coca Cola)
सुरक्षा अधिकाऱ्यांवर आरोप
सुरक्षा अधिका-यांनी कामगारांना त्यांच्या मनगटावरील गंडेदोरे काढून टाकण्याच्या अटीवर कारखान्यात (Coca Cola) प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे. ही घटना व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचा निषेध केला आहे. सध्या या घटनेबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
Join Our WhatsApp Community