भारतात अमली पदार्थाच्या तस्करीसाठी परदेशी महिलांचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर समोर आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DIR) ब्राझील देशाची नागतिक असलेल्या एका महिलेला अटक करून तीच्या शरीरातून कोकेन या अमली पदार्थाने भरलेल्या १२४ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहे. डीआयआरच्या अधिकारऱ्यानी या महिलेकडूच्या पोटातून बाहेर काढण्यात आलेल्या कोकेनने भरलेल्या कॅप्सूलची किंमत ९.७३ कोटी असल्याची माहिती आहे. (Drugs Smuggling)
महसूल गुप्तचर विभागाने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर साओ पाउलोहून देशातून आलेल्या ब्राझीलची नागरिक असलेल्या महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता कोकेन या अमली पदार्थने भरलेल्या कॅप्सूल तीने सेवन केल्याची कबुली दिली.
(हेही वाचा – धारावीत मशिदीवरील कारवाईच्या वेळी निर्माण झालेल्या तणावाला उबाठा आणि काँग्रेस जबाबदार; Kirit Somaiya यांचा आरोप)
डीआयआरने तीला सर. जेजे रुग्णालयात आणून तिची वैद्यकीय तपासणी केली हसत तिच्या शरीरात कॅप्सूल असल्याचे समोर आले, डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातून जवळपास १२४ कोकेनने भरलेल्या कॅप्सूल बाहेर काढून या महिलेचा जीव वाचवला आहे, यापैकी एक ही कॅप्सूल पोटात फुटली असती तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता असे डॉक्टरांनी सांगितले. (Drugs Smuggling)
डीआयआर (DIR) ने या कॅप्सूल जप्त करून या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेला कोकेनने भरलेले कॅप्सूल भारतात पोचविण्यासाठी काही रक्कम मिळणार होती, या महिलेचा अमली पदार्थ तस्करीसाठी वापर करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community