Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून वांद्रे इथं प्लॉट

या जागेवर अजिंक्य आपली क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे.

80
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून वांद्रे इथं प्लॉट
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून वांद्रे इथं प्लॉट
  • ऋजुता लुकतुके

राज्य मंत्रिमंडळाने मुंबईत वांद्रे इथं २,००० वर्गमीटर आकारमानाचा एक जमिनीचा तुकडा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) क्रिकेट अकादमीसाठी देण्याला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी १९८८ मध्ये हीच जमीन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना इनडोअर क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी देण्यात आली होती. पण, गावसकर यांनी जमिनीचा ताबा घेतला नव्हता. आता अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) भाडेत्त्वावर ही जमीन देण्यात येणार आहे.

महसूल विभागाने पुढील ३० वर्षांसाठी ही जागा अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) भाडेतत्त्वावर दिल्याचं सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं आहे. गावसकर यांनी त्यांना मिळालेल्या जमिनीवर अपेक्षित बांधकाम न केल्यामुळे सरकारने ही जागा पुन्हा ताब्यात घेतली होती. आणि आता ती रहाणेला देऊ केली आहे. सध्या ही जागा काही झोपडीधारक बेकायदेशीररित्या वापरत आहेत. त्यामुळे जागा मोक्याची असली तरी तिथे सध्या दुरवस्था आहे.

(हेही वाचा – Water Pipe Lines : भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘त्या’ दोन्ही जलवाहिन्यांची ठाण्याला होते अडचण)

या जागेविषयी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी २०२१ मध्ये पहिल्यांदा आवाज उठवला होता. गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या जागेवर कुठलंही बांधकाम केलं नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. ‘गावसकर यांचं नाव आणि त्यांचं क्रिकेटला दिलेलं योगदान बघून या जागेच्या बाबतीत मी गप्प आहे. पण, इतक्या मोक्याच्या जागी मुंबईत असलेली जागा त्यांनी मोकळी सोडायला नको होती, असं आव्हाड त्या जागेविषयी तेव्हा म्हणाले होते.

त्यानंतर २०२२ मध्ये सुनील गावसकर ट्रस्टने ही जागा म्हाडाला परतही केली. दरम्यानच्या काळात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) जागेसाठी अर्ज केला होता. तो पाहता आताच्या मंत्रिमंडळाने तीच जागा रहाणेला देऊ केली. आणि तो व्यवहार आता लवकरच पूर्ण होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.