State Politics : कोण आहेत नवे राजकीय काका-पुतणे?

181
State Politics : कोण आहेत नवे राजकीय काका-पुतणे?
  • सुजित महामुलकर

राज्याच्या राजकारणाला काका-पुतण्या काही नवीन नाहीत. गेली २५-३० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण काका-पुतण्याभोवती फिरत असल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, शरद पवार-अजित पवार, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे ते सहकार घराण्यातील विजयसिंह मोहिते-पाटील-धैर्यशील मोहिते-पाटील, अजित पवार-रोहित पवार अशी परंपरा लाभलेल्या या राज्यात आता ही परंपरा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणखी पुढे जाणार आहे, याचे कारण काही नव्या पुतण्यांची राजकारणात ‘एन्ट्री’ होत आहे. (State Politics)

(हेही वाचा – Uddhav Thackeray आणि संजय राऊत यांना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार)

मंगळवेढ्यात सावंत

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (शिवसेना शिंदे) (Sawant) यांचे पुतणे अनिल सावंत (Sawant) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघातून अनिल सावंत (Sawant) इच्छुक असून त्यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. तसेच विधानसभा क्षेत्रात अनिल सावंत (Sawant) यांनी काही भेटीगाठी सुरू केल्या असल्याचे सांगण्यात आले. मंगळवेढा भैरवनाथ साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर अनिल सावंत (Sawant) ‘तुतारी’ हाती घेणार असल्याची चर्चा मंगळवेढा परिसरात होत आहे. (State Politics)

(हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून वांद्रे इथं प्लॉट)

कोकणातही काका-पुतणे

तानाजी सावंत यांच्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील दुसरे नेते रामदास कदम (Kadam) यांचे पुतणे अनिकेत हेदेखील राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. रामदास कदम (Kadam) आणि त्यांचे बंधू सदानंद कदम यांच्यातील वाद, विशेषतः शिवसेनेत फूट पडल्यानंतर, सर्वश्रूत आहेच. त्यातूनच अनिकेत सदानंद कदम (Kadam) हे आता त्यांचे सख्खे चुलत बंधू योगेश कदम (Kadam) यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येते. खेड दापोली मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे संभाव्य उमेदवार संजय कदम (Kadam) यांना तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांना निवडून आणण्यासाठी अनिकेत कदम (Kadam) मदत करणार आहेत. त्यामुळे कदम विरुद्ध कदम असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. दापोलीमध्ये उबाठा गटाच्या बॅनरवर अनिकेत कदम (Kadam) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स नुकतेच झळकले आहेत. (State Politics)

(हेही वाचा – Siddhivinayak Prasad : ‘तो’ व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण)

सिंदखेड राजा मतदारसंघात काका-पुतणी

अजित पवार (Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री गणेश शिंगणे (Shingane) यांनी नुकताच शरद पवार (Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या नव्या काका-पुतणीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा मतदारसंघात काका-पुतणी म्हणजेच डॉ. राजेंद्र शिंगणे (Shingane) विरुद्ध गायत्री शिंगणे (Shingane) अंशी लढत झाली तर आश्चर्य वाटू नये. (State Politics)

(हेही वाचा – Tsuchinshan Atlas धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ)

मोहिते घराण्याचा आणखी एक पुतण्या

पश्चिम महाराष्ट्रातील माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील (Mohite) यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते-पाटील (Mohite) यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते यांच्या प्रचारात माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवतेजसिंह (Mohite) यांनी सांभाळली होती. शिवतेज (Mohite) हे अकलूजचे माजी सरपंच असून बांधकाम व्यावसायिक (शिवरत्न कन्स्ट्रक्शन) असल्याचे समजते. (State Politics)

सध्या बबनराव शिंदे हे माढा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत तर यावेळी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत, मात्र गेल्या काही दिवसात त्यांनी पुत्र रणजितसिंह यांच्यासह शरद पवार (Pawar) यांची भेट घेतल्याने मतदारसंघात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवतेजसिंह यांना शरद पवार गटांकडून उमेदवारी मिळाली तर रणजितसिंह विरुद्ध शिवतेजसिंह (Mohite) असा शरद पवार (Pawar) विरुद्ध अजित पवार (Pawar), काका-पुतणे, सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (State Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.