साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अक्षय शिंदे मृत्यू (Akshay Shinde Encounter) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे, असे खासदार उदयनराजे म्हणाले आहेत. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणी ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी एनएचआरसी, न्यायदंडाधिकारी, एसीएस होम आणि सीआयडी यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिली आहे. राज्य सीआयडी या प्रकरणाची चौकशी करेल आणि न्यायदंडाधिकारी चौकशीही केली जाईल.
“अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे”
खासदार उदयनराजे म्हणाले, “सत्ताधारी विरोधक मला काही घेणदेणे नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? बोलले असते का? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे.” (Akshay Shinde Encounter)
“…त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे”
“मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या.” असे उदयनराजे म्हणाले. (Akshay Shinde Encounter)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community