Book My Show : बुक माय शो ॲप का क्रॅश झालं?

Book My Show : कोल्डप्ले साठी लोकांची झुंबड, ॲपच झालं बंद. 

54
Book My Show : बुक माय शो ॲप का क्रॅश झालं?
  • ऋजुता लुकतुके

ऑनलाईन तिकीट खरेदी करण्यासाठीचं व्यासपीठ बुक माय शो (Book My Show) रविवारी चक्क काही तासांसाठी बंद पडलं होतं. झालं असं की, ब्रिटिश बँड कोल्डप्लेचा पुढील वर्षी भारतात एक जाहीर शो होणार आहे. २२ सप्टेंबरपासून भारतात त्याची तिकीट विक्री सुरू झाली. ऑनलाईन विक्री बुक माय शोवर होणार होती. दुपारी १२ वाजता बुकिंग सुरू झालं. लोकांचा रेटाच असा होता की, साईट आणि ॲप काही मिनिटांतच कोलमडलं.

बुकिंग पुन्हा सुरू होण्यात मध्ये अर्धा तास गेला. कोल्डप्ले २०१६ नंतर पहिल्यांदा भारतात सादर होणार आहे. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता लोकांमध्ये आहे. नवी मुंबईत डी वाय पाटील मैदानात १८ आणि १९ जानेवारीला कोल्डप्ले संगीत मैफल होणार आहे. यासाठी तिकिटांची किंमत २,५०० रुपयांपासून सुरू होणार आहे. तर सगळ्यात महाग तिकीट ३५,००० रुपये इतकं आहे.

(हेही वाचा – Irani Trophy 2024 : इराणी चषकात अजिंक्य रहाणेच मुंबईचा कर्णधार, १ ऑक्टोबरला लखनौला सामना)

कोल्डप्ले हा १९९७ मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेला ब्रिटिश रॉक बँड आहे. बँडमध्ये गायक आणि पियानोवादक ख्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बास वादक गाय बेरीमन, ड्रमर आणि तालवादक विल चॅम्पियन आणि व्यवस्थापक फिल हार्वे यांचा समावेश आहे.

ते विशेषतः त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. बँडचा उगम युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे झाला. या समुहाने आतापर्यंत आपली नावं तीनदा बदलली आहेत. बिग फॅट नॉइज, नंतर स्टारफिश आणि आता कोल्डप्ले अशी ओळख त्यांना मिळाली आहे. बँडला ग्रॅमी अवॉर्ड्स, ब्रिट अवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तर बुक माय शो हे सध्या भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन तिकीट बुकिंगची सेवा देणारे ॲप आहे. १९९९ मध्ये सुरू झालेल्या या ॲपवर आता आपण सिनेमा, नाटकाबरोबरच इतर अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं बुकिंग करू शकतो. (Book My Show)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.