NetFlix India : नेटफ्लिक्स इंडियावर कर चुकवेगिरी आणि वांशिक भेदभावाचे आरोप, काय आहे प्रकरण?

NetFlix India : नेटफ्लिक्स इंडिया सध्या सरकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.

43
NetFlix India : नेटफ्लिक्स इंडियावर कर चुकवेगिरी आणि वांशिक भेदभावाचे आरोप, काय आहे प्रकरण?
  • ऋजुता लुकतुके

नेटफ्लिक्स (NetFlix India) ही देशातील आघाडीची ओटीटी वाहिनी सध्या केंद्र सरकारच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. आर्थिक अनियमितता, कर चुकवेगिरी आणि वांशिक भेदभावाचा कंपनीवर आरोप आहे. भारतीय यंत्रणेकडून त्यासाठी कंपनीची चौकशीही सुरू असल्याचं समजतंय. रॉयटर्सने सरकारी ईमेलचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter: “तुडवून मारायला पाहिजे होतं”, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया!)

भारताच्या गृह मंत्रालयाच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाचे (FRRO) अधिकारी दीपक यादव यांनी २० जुलै रोजी भारतातील नेटफ्लिक्सच्या (NetFlix India) व्यवसाय आणि कायदेशीर व्यवहाराच्या माजी संचालक नंदिनी मेहता यांना पाठवलेला एक ईमेल अलीकडेच समोर आला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, ‘हा ईमेल व्हिसा आणि भारतातील नेटफ्लिक्सच्या व्यवसाय पद्धतींशी संबंधित कर उल्लंघनाच्या चिंतेबद्दल आहे. कंपनीने सरकारी नियम न पाळणे, व्हिसा नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर संरचना, कर चोरी आणि वांशिक भेदभावाच्या घटनांसह विविध गैरप्रकार भारत सरकारला आढळले असून त्याविषयी कंपनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे.

(हेही वाचा – ICC Women’s T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषकाचं अधिकृत गाणं लाँच, ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार स्पर्धा)

नेटफ्लिक्सच्या (NetFlix India) प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, कंपनीला भारत सरकारच्या कोणत्याही तपासाची माहिती नाही. नंदिनी मेहता यांनी २०२० मध्ये नेटफ्लिक्स सोडले. यानंतर त्यांनी नेटफ्लिक्सविरुद्ध चुकीच्या पद्धतीने आपल्याला काढून टाकण्यात आल्याबद्दल वांशिक तसंच लैंगिक भेदभावासाठी अमेरिकेत खटला दाखल केला. मात्र, नेटफ्लिक्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मेहता यांनी भारत सरकारच्या तपासाचे स्वागत केले आणि तपासाचे निकाल सार्वजनिक केले जातील, अशी आशा व्यक्त केली. मात्र, अनेक आरोपांबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. नेटफ्लिक्सविरुद्ध भारतात आधीच अनेक तपास सुरू आहेत. नेटफ्लिक्सचे भारतात सुमारे १ कोटी ग्राहक आहेत. कंपनीने बॉलीवूड सेलिब्रिटींचा समावेश असलेल्या कार्यक्रम निर्मितीत मोठी गुंतवणूक केली आहे. पण, त्याचवेळी भारत सरकारचे काही नियम धुडकावून लावल्याचा आरोपही आता कंपनीवर झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.