Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ६ पुरुषांचा अनोखा प्रताप!

242
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ६ पुरुषांचा अनोखा प्रताप!
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ६ पुरुषांचा अनोखा प्रताप!

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणलेल्या या योजनेला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता या योजनेत शासनाची फसवणूक करणारे प्रकारही समोर आले आहेत. अकोल्यात चक्क सहा युवकांनी अर्ज केल्याची बाब उघडकीस आली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता 6 पुरुषांनी अर्ज भरल्याच तपासात आढळून आलं आहे. या गंभीर प्रकारानंतर आता एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अकोल्यात एका पुरुषाने अर्ज केल्याचं आढळून आलं होतं. आता पुन्हा सहा पुरुषांनी अर्ज केल्याचं समोर आलं आहे.

(हेही वाचा-Akshay Shinde Encounter: “तुडवून मारायला पाहिजे होतं”, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया!)

मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सदर योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील 4 लाख 35 हजार 238 महिलांनी लाडकी बहीण योजने बाबत ऑनलाइन तसेच ऑफलाईन फॉर्म भरले आहेत. यापैकी 4 लाख 26 हजार 240 फॉर्म मंजूर झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान 6 हजार महिलांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या आढळल्या आहेत. तर अकोला जिल्ह्यातील तब्बल 27 हजार महिलांचे आधार सीडिंग झाले नसल्याने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही आहे. मात्र, हे सर्व सुरू असतांना अकोला जिल्ह्यात एक खळबळजनक प्रताप उघडकीस आला आहे. अकोला शहरातील सहा युवकांनी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) फॉर्म भरल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यापूर्वीही एका पुरुषाने अर्ज केल्याचे अकोल्यात समोर आले होते. आता पुन्हा सहा जणांकडून या योजनेचे पैसे लाटण्यासाठी अर्ज करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

(हेही वाचा-Haryana Assembly Elections : काँग्रेसच्या अडचणीत वाढ)

दरम्यान, ज्या सहाही युवकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करणारे हे सहाही जण अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी आहेत. या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर सहा युवकांना नोटीस पाठवून खुलासा मागण्यात आला आहे. तर आता या सहा पुरुषांना आधार कार्ड द्वारे कोणतेही लाभ मिळणार नसल्याचं संबंधित विभागाने म्हंटल आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

यापूर्वीही असे अनेक प्रकार !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची नोंदणी अजूनही सुरूच आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. तर काही पुरुषांनी अर्ज भरल्याचे अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.