एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेट; Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठीची रणनीती?

73
एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेट; Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठीची रणनीती?
  • खास प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवर ‘विकास कामां’चा मुलामा चढवण्यात आला असला तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत काही जागांवर विशेषतः मुंबईत ‘मैत्रीपूर्ण’ लढत देऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शह देण्याची रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

(हेही वाचा – धारावीत मशिदीवरील कारवाईच्या वेळी निर्माण झालेल्या तणावाला उबाठा आणि काँग्रेस जबाबदार; Kirit Somaiya यांचा आरोप)

‘उबाठा’चा ‘जीव’ मुंबईत

शिवसेना उबाठाचा ‘जीव’ हा मुंबईरूपी ‘पोपटा’त आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा यांच्या जागावाटपात जो काही वाद आहे तो प्रामुख्याने मुंबईतील जागांवरून आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे ३६ पैकी किमान २२-२३ जागा उबाठाला हव्या आहेत आणि त्यातही पसंती हवी. मात्र काँग्रेस त्यासाठी तयार नाही, यावरच जागावाटापाचं घोडं अडलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ‘मनसे’ने महायुतीला एकही जागा न घेता बिनशर्त पाठिंबा दिला होता.

(हेही वाचा – Uddhav Thackeray आणि संजय राऊत यांना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार)

.. अन्यथा मतविभागणीचा फटका

शिवसेना आणि मनसे यांना मुंबईमध्ये उबाठाला शह द्यायचा आहे आणि तोही प्रामुख्याने मुंबईतच. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांनी मैत्रीपूर्ण लढत लढली तरच उबाठाला नियंत्रणात ठेवणे शक्य आहे, यावर चर्चा झाल्याचे कळते. अन्यथा शिवसेना आणि मनसे यांच्या मतविभागणीचा फायदा उबाठाला होईल आणि शिवसेना-मनसेला त्याचा फटका बसू शकतो, हे उघड आहे.

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter: “तुडवून मारायला पाहिजे होतं”, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया!)

शिवडी-माहीम-वरळी लक्ष्य

मुंबईत मनसेची ताकद असलेल्या काही ठराविक मतदारसंघात शिवसेना राज ठाकरे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेने माजी आमदार आणि राज यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते बाळा नांदगावकर यांची उमेदवारी घोषित केली. या ठिकाणी उबाठाचे विद्यमान आमदार अजय चौधरी असून उबाठाचे पारडे जड मानले जात आहे. तसेच वरळी मतदारसंघात विद्यमान आमदार आदित्य ठाकरे असून मनसेकडून संदीप देशपांडे यांचे नाव चर्चेत आहे. तर माहीम मतदारसंघात मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचे नाव आघडीवर आहे. माहीम मतदारसंघात विद्यमान आमदार सदा सरवणकर हे शिवसेनेत आहेत.

(हेही वाचा – Book My Show : बुक माय शो ॲप का क्रॅश झालं?)

एकमेकांना सहकार्य

अशा काही जागांवर शिंदे यांचा पाठिंबा मिळाला तर मनसेचे उमेदवार निवडून येण्यास मदत होऊ शकते. त्या बदल्यात अन्य काही ठिकाणी मनसे शिंदे यांना मदत करू शकते, अशी काहीशी रणनीती आखली जाण्याची शक्यता असल्याचे समजते. या रणनीतीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शह देता येऊ शकेल आणि शिवसेना-मनसेचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यास पाठबळ मिळेल, हा विचार या बैठकीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.