बदलापूर ळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Akshay Shinde Encounter) आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी या घटनेचे समर्थन केले आहे.
(हेही वाचा-आधी विरोधक म्हणायचे Akshay Shinde ला लगेच फाशी द्या; मग आता का ओरडत आहेत?; अजित पवारांचा संताप)
अक्षय शिंदेचा (Akshay Shinde Encounter) मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत जल्लोष साजरा केला. तसेच शिवसेनेकडून सुद्धा बदलापूर रेल्वे स्थानकावर पेढे वाटण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना ५१ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत पण याचं उत्तर असंच दिलं पाहिजे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसेच, जे झालं ते योग्य झालं. मी याआधीच म्हटलं होतं. आमचं सरकार असतं तर थेट एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचं आम्ही समर्थन करतो. असंही अविनाश जाधवांनी म्हटले आहे. (Akshay Shinde Encounter)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community