Amit Thackeray ही विधानसभा निवडणूक लढणार?

44
Amit Thackeray ही विधानसभा निवडणूक लढणार?
  • खास प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तर अमित ठाकरे यांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला आहे. पण खरंच अमित ठाकरे या विधानसभेला निवडणूक रिंगणात असतील?

आदित्य ठाकरे यांचीही चर्चा होती

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळीही अशा चर्चा राजकीय वर्तुळात झडल्या होत्या. मग कोणता मतदारसंघ निवडणार? मुंबई की मुंबईबाहेरचा मतदारसंघ असेल? अशा चर्चाना उधाण आले होते. अखेर आदित्य यांच्या वरळीत फेऱ्या वाढल्या, कार्यक्रम घेण्यास सुरूवात झाली, बैठका वाढू लागल्या आणि चित्र स्पष्ट झाले की वरळी मतदारसंघ त्यांनी निवडला.

(हेही वाचा – Pakistan मध्ये ८२ टक्के बलात्कार घरातच होतात; पाकिस्तानी महिला खासदाराची धक्कादायक माहिती)

विरोधी आव्हान संपुष्टात

वरळीत स्थानिक शिवसेना आमदार सुनील शिंदे यांची चांगली पकड या मतदारसंघावर होती. तर जुलै २०१९ मध्येच, म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष आणि वरळीचे माजी आमदार सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. यामुळे वरळीत तसा आदित्य ठाकरे यांना मतदारसंघ जिंकणे म्हणजे ‘केकवॉक’च होते कारण विरोधी बाजूला कुणी आव्हानात्मक उमेदवारच राहिला नव्हता.

मतदारांना गृहीत धरणे धोका

ही तयारी करणे स्वाभाविकच होते कारण ‘ठाकरे’ या नावाला महाराष्ट्रातच नाही तर देशात एक वलय आहे. ही पार्श्वभूमी देण्याचे कारण की, अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नावालाही एक वलय आहे. राज ठाकरे यांचे चाहते मराठी माणूसच नाही तर अन्य भाषिकही आहेत. अमित यांच्या निवडणुकीसाठी अशी तयारी झाल्याचे सदया तरी चित्र दिसत नाही. कुणीही उमेदवार निवडणुकीला उभा राहण्यापूर्वी मतदार संघात त्याचा संपर्क, भेटीगाठी, लोकांमध्ये मिसळणे, त्या मतदारसंघात फिरणे, कार्यक्रमांना हजेरी लावणे, वेळोवेळी आढावा बैठका घेणे ही ओघाने आलेच. मतदारांना गृहीत धरून निवडणूक लढणे हे धोक्याचे ठरू शकते.

(हेही वाचा – आधी विरोधक म्हणायचे Akshay Shinde ला लगेच फाशी द्या; मग आता का ओरडत आहेत?; अजित पवारांचा संताप)

अमित ठाकरे लढण्याची शक्यता कमी

पुढील पंधरा दिवसात आचारसंहिता लागण्याची वेळ आली असताना मतदारसंघ निवडून थेट निवडणुकीला सामोरे जाण्याचा धोका लक्षात घेता, अमित ठाकरे (Amit Thackeray) या विधानसभेला उभे राहतील, असे सध्या तरी दिसत नसल्याचे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे चर्चा तर होत असल्या तरी त्यात किती तथ्य आहे, हे यावरून लक्षात येते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.