नागरिकांना सशक्त आणि अखंड भारताच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी, याकरता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या साहित्याचे वाचन दर गुरुवार, संध्याकाळ ५.३० ते ६.३० या वेळेत केले जाते.
(हेही वाचा Pakistan मध्ये ८२ टक्के बलात्कार घरातच होतात; पाकिस्तानी महिला खासदाराची धक्कादायक माहिती)
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आम्ही या राष्ट्रीय नायकाचे साहित्य वाचण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी जमतो. हा कार्यक्रम देशभक्ती प्रज्वलित करत आहे आणि नागरिकांना सशक्त, अखंड भारताच्या दिशेने काम करण्याची प्रेरणा देत आहे. भारताच्या इतिहासाची आणि वारशाची सखोल माहिती वाढवणे, राष्ट्रासाठी प्रेम पुन्हा जागृत करणे, समविचारी व्यक्तींशी संपर्क साधून देशभक्तीची आवड वाढवणे, असा उद्देश या मागील आहे. या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीपाद काळे यांनी केले. याकरता पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. (Veer Savarkar)
- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक +91 22 2446 5877
- श्रीपाद काळे – 9869447431
Join Our WhatsApp Community