भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीवर तीन जणांनी लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे, तीन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय पीडित मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली होती, या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन तिच्या मित्राने त्याचा गैरफायदा घेत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील छायाचित्रे काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केला.
पीडित मुलीच्या मित्राने हे छायाचित्र दोन मित्रांना पाठवून त्यांनी देखील हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडतेवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केला, हा प्रकार पीडित मुलीच्या घरी कळताच कुटूंबियांना मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार कुटूंबियांना सांगितला, कुटुंबीयांनी भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. भायखळा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे, तीन आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community