Future-Option Investors : फ्युचर, ऑपशनमधील १० पैकी ९ गुंतवणूकदार पैसे गमावतात, सेबीचा धक्कादायक आकडा

Future-Option Investors : फ्युचर, ऑपशनच्या नादात तिशीच्या आतील तरुणांनी १.८ लाख कोटी रुपये बुडवले आहेत.

165
Future-Option Investors : फ्युचर, ऑपशनमधील १० पैकी ९ गुंतवणूकदार पैसे गमावतात, सेबीचा धक्कादायक आकडा
  • ऋजुता लुकतुके

फ्युचर आणि ऑपशन या शेअर बाजारातील गुंतवणूक प्रकाराकडे अलीकडे अनेक तरुण आकर्षित झाले आहेत. कमी वेळेत आणि कमी पैशाच भरघोस नफा म्हणून ते याकडे पाहतात. पण, प्रत्यक्षात मोठी जोखीम घेऊन हातात काही पडत नसल्याचंच सेबी अर्थात, शेअर बाजारा नियामक संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आलं आहे. १० पैकी ९ किरकोळ गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले आहेत. एकूण ९३ टक्के व्यवहार हे नुकसानीत निघाले आहेत. आणि या सगळ्यात गुंतवणूकदारांच्या १.८ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला असल्याचं सेबीच्या अभ्यासातून समोर आलं आहे. (Future-Option Investors)

(हेही वाचा – BMC : इटलीत महापालिकेचे ‘मोटे’ यश, महापालिकेचे उपायुक्त ठरले आयर्नमॅन)

सेबीच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे की, ‘इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे. म्हणून, आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत आणि सर्व श्रेणींसाठी फ्युचर आणि ऑपशनमधील किरकोळ गुंतवणूकदारांना झालेला नफा आणि तोटा यांचा अभ्यास करण्यासाठी सेबीनं पावलं उचलली.

यापूर्वी, सेबीने जानेवारी २०२३ मध्ये एक अभ्यास प्रकाशित केला होता. तेव्हाही आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नुकसान सहन करावं लागलेल्या फ्युचर ऑपशन गुंतवणूकदारांची संक्या ८९ टक्के अशी धोकादायकच होती. आता नवीन अभ्यासातील ठळक मुद्दे पाहूया, (Future-Option Investors)

(हेही वाचा – अंगणवाडीत नोकरीसाठी उर्दूची सक्ती! Karnataka Congress सरकारच्या निर्णयावर भाजपाने साधला निशाणा)

  • तोट्यात असलेल्या गुंतवणूकदारांपैकी जवळ जवळ ४ लाख लोकांना प्रत्येकी सरासरी २८ लाखांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.
  •  फ्युचर व ऑपशनवर भरावे लागणारे विविध कर वगळले तर फक्त १ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांना यातून १ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक नफा मिळाला आहे.
  • याउलट पोर्टफोलिओ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूदारांनी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण २८,००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
  • तर किरकोळ गुंतवणूकदारांचा तोटा याच कालावधीत ६१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • ज्यांनी ट्रेडिंग अल्गोरिदम वापरला, त्यापैकी ९७ टक्के एफपीआय आणि ९६ टक्के प्रोप्रायटरी गुंतवणूकदारांना अल्गोरिदममधून नफा झाला
  • नफा न कमावताही फ्युचर व ऑपशन ट्रेडिंगसाठी लोकांनी २६,००० कोटी रुपये फक्त व्यवहार शुल्क म्हणून खर्च केले आहेत.
  • यातील ५१ टक्के रक्कम ब्रोकरेज म्हणून आणि २० टक्के रक्कम विनिमय शुल्क म्हणून खर्च झाली.
  • फ्युचर व ऑपशनमध्ये ट्रेड करणारे गुंतवणूकदार हे प्राथमिकपणे तिशीच्या आतील असल्याचं दिसून आलं. यातही ७० टक्के तरुण हे शहरी भागातील आहेत.
  • सलग काही वर्षं तोटा सहन करूनही ७ टक्के लोकांनी फ्युचर मधील आपले व्यवहार सुरूच ठेवल्याचंही सेबीने सांगितलं. (Future-Option Investors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.