- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर (Dadar) पश्चिम येथील गॅरेज गल्ली, पुस्तक गल्ली आणि कचरा गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गल्लीत कचऱ्याचे डबे आणि त्या कचऱ्यामुळे तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असल्याने तसेच फेरीवाल्यांकडून हातगाड्या तसेच त्यांचे साहित्य ठेवले जात असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका जी उत्तर विभागाच्यावतीने धडक कारवाई करत येथील फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. मात्र, महापालिकेने या कारवाईत कचरा पेट्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबवून त्याठिकाणी दुर्गंधी कमी करण्यासाठी प्रयत्न केलाच नाही. त्यामुळे येथील दुचाकी वाहने हटवून येथील स्वच्छ राखत चालण्यासाठी कधी मोकळी करून दिली जाईल असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.
(हेही वाचा – ‘एक भारत सर्वोत्तम भारत’, ध्येय गाठणे शक्य; Om Birla यांचा ठाम विश्वास)
दादर (Dadar) पश्चिम येथील रानडे मार्ग व एन सी केळकर रोडला जोडल्या जाणाऱ्या गल्लीला पुस्तक गल्ली, कचरा गल्ली तथा गॅरेज गल्ली म्हणून ओळखले जाते. गोल हनुमान मंदिर येथून एन सी केळकर रोडवरून जाणारी गल्ली डिसिल्व्हा शाळेच्या संरक्षक भिंतीच्या लगत जात रानडे मार्गाला मिळते. रानडे मार्गावरील प्रवेशद्वाराजवळ जुन्या पुस्तकांची दुकाने आहेत तर एन सी केळकर रोडवरील प्रवेश मार्गातून फळ आणि चपलाचे स्टॉल्स आहे. या स्टॉल्सच्या पुढील बाजूस विभागातील कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दहा ते अकरा कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचरा पेट्यांमधील संकलित कचरा महापालिकेच्या वाहनांद्वारे दिवसांतून दोन वेळा उचलून नेला जातो. परंतु याठिकाणी पेट्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी बाहेरच कचरा टाकला जातो, तसेच या कचऱ्यातील पाणी खाली वाहून तिथे चिखलाची स्थिती निर्माण होते आणि यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली जाते. तसेच याठिकाणी दुचाकी वाहने, फेरीवाल्यांचे सामान, गदुर्ले यांचा त्रास तसेच याभागात मलवाहिनी व कचऱ्याच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याबाबत रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला पत्रही लिहिले होते. याबाबत हिदुस्थान पोस्टने ‘महापालिका प्रशासन हप्ते देणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आहे की करदात्यांसाठी : दादरच्या पुस्तक गल्लीची कधी होणार साफसफाई’या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केली.
(हेही वाचा – Dadar : महापालिका प्रशासन हप्ते देणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आहे की करदात्यांसाठी; दादरच्या पुस्तक गल्लीची कधी होणार साफसफाई)
या वृत्तानंतर मंगळवारी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या निर्देशानुसार या गल्लीत महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या पथकाने फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. परंतु दुचाकी वाहने गल्लीच्या दोन्ही बाजुला असल्याने तसेच कचरा पेट्यांच्या परिसरात मलवाहिनी व कचऱ्याचे पाणी पसरत असल्याने यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा त्रास अद्याप कमी झालेला नाही. तसेच येथील स्वच्छता न केल्याने येथील रहिवाशांच्या समस्या आजही कायम आहे. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केल्याने नागरिकांचे समाधान झाले असले या गल्लीत स्वच्छता राखली न गेल्याने रहिवाशांचे समाधान अद्यापही झालेले नाही. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community