मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला २५ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाण्यात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर मध्ये ऑरेंज अलर्ट आहे. (Mumbai Rains)
(हेही वाचा – Dadar : पुस्तक गल्लीतील फेरीवाल्यांचे साहित्य जप्त, पण कचर्याच्या दुर्गंधीचा समस्या संपणार कधी?)
महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरु झाला असून 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार
पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला असून घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि राजस्थानातील काही भागातून मान्सून माघारी फिरल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमधील देखील काही भागातून मान्सून माघारी परतला. महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि गोव्यात 26 सप्टेंबरपर्यंत काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Rains)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community