-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागच्या कर्मचाऱ्यांचा मागील १९ महिन्यांपासून प्रलंबित असलेला अतिकालिन भत्ता अर्थात ओवर टाईम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड (Prashant Gaikwad) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून उपायुक्त (वित्त) यांनी तात्काळ सुरक्षा रक्षक जवान यांच्या जानेवारी २०२३ पासूनच्या प्रलंबित भत्त्याची रक्कम देण्याची निर्देश दिले आहेत. (BMC)
(हेही वाचा- Dadar : पुस्तक गल्लीतील फेरीवाल्यांचे साहित्य जप्त, पण कचर्याच्या दुर्गंधीचा समस्या संपणार कधी?)
मुंबई महापालिका सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना विहीत वेळेत दिला जावा व त्यांची आर्थिक पिळवणुक थांबवावी यासाठी उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड (Prashant Gaikwad) यांच्या दालनात म्युनिसिपल कर्मचारी सेने’च्या वतीने बैठक घेण्यात आली. म्युनिसिपल कर्मचारी सेने’चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर (Dr. Sanjay Kamble) यांच्यासह या बैठकीला सुरक्षा खात्याचे उपप्रमुख सुरक्षा अधिकारी,सहाय्यक सुरक्षा अधिकारी, लेखा अधिकारी, उपप्रमुख लेखापाल, लेखापरिक्षक आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षक यांना जानेवारी २०२३ पासून ओवर टाईम चा भत्ता प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी उपायुक्त(वित्त) यांनी याबाबत संबंधीत विभागाकडे विचारणा करत या भत्त्याची रक्कम देण्यास विलंब का झाला याची कारणे जाणून घेत त्यांची कानउघाडणी केली. ओवर टाईम च्या भत्त्याची रक्कम प्रलंबित ठेवण्याचे कारण नसतानाही या भत्त्याचा लाभ वेळीच न दिल्याने उपायुक्त(वित्त) यांनी संबधित विभागाच्या तीव्र नाराजी व्यक्त करत सुरक्षा विभागाने सादर केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित सर्व महिन्यांची भत्त्याची रक्कम त्वरित द्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. (BMC)
मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सुरक्षा रक्षक जवांनाची ९७ पदे मंजूर असून काही लिपिक झाल्याने तसेच काही सेवा निवृत्त झाल्याने तब्बल ४५ टक्के पदे ही केवळ मुख्यालय इमारतीत रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच सुरक्षा रक्षकांना नियमित ड्युटी पेक्षा अधिकची सेवा बजवावी लागते. त्यामुळे या अधिकच्या सेवेसाठीची रक्कम ओवर टाईम भत्त्याच्या स्वरूपात दिला जातो. जानेवारी २०२३ पासून या भत्त्याची रक्कम प्रलंबित आहे. (BMC)
(हेही वाचा- “पक्षांतर्गत गटबाजी अजिबात खपवून घेणार नाही”, केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी ठणकावलं)
महापालिका सुरक्षा विभागाच्या जवानांचा अतिकालिन भत्ता हा लेखा अधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे प्रलंबित होता. त्यामुळे युनियनच्या मागणीनुसार उपायुक्त (वित्त) यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जवानांचा ओवर टाईम भत्ता वेळीच मिळेल असा विश्वास बापेरकर यांनी व्यक्त केला आहे. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community